Amit Thackeray On Senate Election Sarkarnama
मुंबई

Amit Thackeray On Senate Election : 'सिनेट'वरुन अमित ठाकरेंचं सरकारला खुलं आव्हान ; म्हणाले, मैदानातून पळणं हा काही...!

MNS On Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका भीती वाटत असल्यानेच पुढे ढकलल्या आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : मुंबई विद्यापीठाने राज्य सरकारच्या निर्देशानुसार आणि त्या अनुषंगाने व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत विद्यापीठाने अचानकपणे गुरुवारी रात्री उशिरा परिपत्रक काढल्यामुळे विद्यार्थी संघटनांमध्ये निराशेचे वातावरण पसरलेले असून राजकीय वातावरण तापले आहेत. ठाकरे गट आणि मनसे उभे ठाकले आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका (Senate Election) भीती वाटत असल्यानेच पुढे ढकलल्या आहेत. तसेच आम्ही निवडणुकांसाठी १०० टक्के तयार आहे. पण निवडणुका पुढे ढकलणे हा काही पर्याय नाही. निवडणुका पुढे ढकलणे हा हुकुमशाही पध्दतीचा निर्णय आहे, असा हल्लाबोल मनसे विद्यार्थी सेनेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी राज्यातील शिंदे - फडणवीस - पवार सरकारवर केला आहे.

मनसे नेते अमित ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकांना स्थगिती देण्याच्या निर्णयावरुन चांगलेच ताशेरे ओढले. ठाकरे म्हणाले, राज्य सरकारच्या हातातच विद्यार्थ्यांचं भविष्य आहे आणि हेच आता निवडणुका पुढे ढकलण्याबाबत स्पष्टीकरण देत नाही. त्यांनी स्पष्टीकरण द्यायला हवे. अनेक प्रश्न या निवडणुकांवर अवलंबून आहे. या सिनेटमध्ये नोंदणी बोगस झाली हे आपण मान्य करू. ती बोगस नोंदणी बाहेर काढायला किती दिवस पाहिजे हे तुम्ही सांगा ना असेही ते यावेळी म्हणाले.

मैदानातून पळणं हा काही पर्याय नाही, ते चुकीचे आहे. यात राज्य सरकारची यंत्रणा देखील दोषी आहेच असेही ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच तुम्ही ऑफलाईन करा किंवा ऑनलाईन आम्ही आमचे १०० टक्के तयार आहोत. तुम्ही काहीही बोला आपला पक्ष ज्या पध्दतीने सिनेट निवडणुकीत उतरलाय ना त्या भीतीने ही निवडणूक रद्द झाली आहे असा हल्लाबोलही ठाकरेंनी यावेळी केला. (MNS News)

अमित ठाकरे म्हणाले, निवडणुका पुढे गेल्यात हे मान्य करायला लागेल. पण आता निवडणुका कधी घेणार हे स्पष्ट करा. तुम्ही २० दिवसांत बोगस नोंदणी बाहेर काढा. आपण एक महिन्यात निवडणुका लावू असेही ते यावेळी म्हणाले.

आदित्य ठाकरेंना टोला..

निवडणुकीच्यावेळी हे बिळात लपून बसतात.आणि अशी स्थगिती वगैरे मिळाली की बाहेर पडतात असा हल्ला त्यांनी आदित्य ठाकरेंवर केला. सर्व पक्ष एकत्र येऊ आणि निवडणुका लावू. लोकं ठरवतील काय करायचे असेही अमित ठाकरेंनी यावेळी सांगितले. स्थगिती मिळाल्यावर काय बोलताय असा सवालही त्यांनी आदित्य ठाकरेंना केला.

एका पक्षाला सारखं कोर्टात जायला आवडतं...

कोर्टात लढण्यापेक्षा आम्ही रस्त्यावर लढण्यात विश्वास ठेवतो. आणि मला माहितीय एक पक्षाला सारखं कोर्टात जायला आवडतं. आणि याही वेळा तो जाणार असा चिमटा त्यांनी ठाकरे गटाला काढला. तसेच सिनेट निवडणुकीची माहिती नाही, पण पुढच्या वर्षीच्या निवडणुकीचा निकाल राज ठाकरेंच्या बाजूने नक्की लागेल असेही अमित ठाकरे यावेळी म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT