MU Senate Election : 'सिनेट'वरून राजकारण तापले; ठाकरे गटानंतर आक्रमक मनसेही मुंबई विद्यापीठात, काय आहे कारण ?

Shivsena-MNS File Candidate Form : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा वाद चिघळणार
Aditya Thackeray, Amit Thackeray
Aditya Thackeray, Amit ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणुकीला गुरुवारी रात्री स्थगिती दिल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. यानंतर शिवसेना युवा सेनेचे माजी सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुनील भिरुड यांची शुक्रवारी भेट घेतली. निवडणूक रद्द झाल्याने त्यांना युवासेनेच्या वतीने जाब विचारण्यात आला आहे. युवासेनेच्या पाठोपाठ आता मनसेही या निवडणुकीवरून आक्रमक झाली आहे. परिणाम शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेत खडाजंगी होण्याची शक्यता आहे. (Latest Political News)

सिनेट निवडणुकीची प्रक्रिया रद्द झाल्याने ठाकरे गटाचे आमदार अदित्य ठाकरे आणि मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरेंनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, स्थिगिती देऊनही शिवसेनेच्या दहा उमेदवारांचे अर्ज स्विकारण्यात आले आहेत. यानंतर आक्रमक झालेली मनसेही मुंबई विद्यापीठात दाखल झाली होती. आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठीच मनसे विद्यापीठात आल्याची माहिती मिळत आहे. यामुळे मनसे आणि ठाकरे गटाचे उमेदवार समोरासमोर येण्याची शक्यता आहे.

Aditya Thackeray, Amit Thackeray
MU Senate Election : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा वाद चिघळणार; स्थगितीनंतरही स्वीकारले शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज

निवडणूक स्थगित केल्याने अमित ठाकरेंनी सरकारचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. दिल्लीतील सत्ताधीशांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सत्तेत आलेल्यांनी हुकूमशाहीचा कारभार सुरू केल्याचा आरोप करत अमित यांनी भाजपला झोडपून काढले. "ही निवडणूक ‘रातोरात’ स्थगित करण्याचे कारण काय? त्यासाठी ‘पहाटेचा मुहूर्त’ शोधला नाही, यासाठी आभार" मानून अमित ठाकरेंनी राज्यपाल-सत्ताधाऱ्यांना चिमटा काढला आहे.

दरम्यान, निवडणूक प्रक्रिया स्थगिती देण्यात आल्यानंतरही शिवसेना युवा सेना ठाकरे गटाच्या दहा सिनेट उमेदवारांचे अर्ज स्वीकारले आहेत. यात प्रदीप सावंत, मिलिंद साटम, परम यादव, अल्पेश भोईर, किसन सावंत (सर्वसाधारण). स्नेहा गवळी (महिला), शीतल शेठ (अनुसूचित जाती), मयूर पांचाळ (ओबीसी), धनराज कोहचडे (अनुसूचित जमाती), शशिकांत झोरे (एनटी) यांचा समावेश आहे. स्थिगितीनंतरही शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज स्विकारल्याने या निवडणुकीला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

Aditya Thackeray, Amit Thackeray
MU Senate Election : आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाची कसोटी टळली; अमित ठाकरे यांचे लॉन्चिंग लांबणीवर

अमित ठाकरे हे राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांना सिनेट निवडणुकांबाबत पत्र लिहीत आपला संताप व्यक्त केला आहे. यानंतर ते शनिवारी राज्यपाल बैस यांची भेट घेणार असल्याचीही माहिती आहे. दरम्यान, निवडणूक प्रक्रिया अचानक रद्द झाल्याने ठाकरे गट-मनसे-भाजपमध्ये चांगलेच रणकंदन सुरू झाले आहे. यामुळे या निवडणुकीबाबत आता काय निर्णय होणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com