amol kirtikar sarkarnama
मुंबई

amol kirtikar : त्या दिवशी नेमकं काय घडलं? अमोल कीर्तिकर म्हणाले, '19 व्या फेरीनंतर कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन'

Pradeep Pendhare

Amol Kirtikar News : मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील लढत अटीतटीची झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेउमेदवार अमोल कीर्तिकर सुरूवातीला विजय झालेले ते पुन्हा मतमोजणीत पराभूत झाले. त्या दिवशी मतदान केंद्रावर नेमकं काय घडलं, याचा घटनाक्रम अमोल कीर्तिकर यांनी मांडला.

'19 व्या फेरीनंतर बरच काही घडलं... आक्षेपासाठी हात वर केला... पुढं मोबाईलाचा घोळ... हे सगळं कन्फ्युजनचं आहे', असं अमोल कीर्तिकर यांनी सांगितलं.

मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध शिवसेना (Shiv Sena) झाली. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे रवींद्र वायकर अवघ्या 48 मतांनी विजयी झाली. अमोल कीर्तिकर यांनी मतदान मोजणीच्या दिवशी केंद्रावर उशिरा पोचले होते. या दिवशी मतदान केंद्रावर बराच काही गोंधळ सुरू असल्याचे सांगितले. 26 व्या फेरीनंतर निवडणूक अधिकारी दोन ते तीन मिनिट थांबल्या. कोणाची हरकत असेल तर, सांगा. त्यासाठी दोन मिनिटांचा वेळ आहे.

यावर माझे सहकारी हरकतीचं निवेदन लिहित होते. हे लिहित असतानाच पुन्हा माईकवरून निवडणूक अधिकाऱ्यांनी नियमानुसार मी दोन मिनिटं थांबले आणि कोणी आक्षेप घेतला नाही, असे जाहीर केले. यावर माझे निवडणूक सहकारी यांनी हात वर करत आक्षेप असल्याचे सांगितले. यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी तुम्ही विहित वेळेत सांगितलं नाही, म्हणून हरकत फेटाळल्याचे अमोल कीर्तिकर यांनी म्हटले.

"निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतलेली हरकत कोणत्या अधिकारात फेटाळली हाच मोठा आमचा आक्षेप आहे. आम्ही घेतलेली हरकत चुकीची नव्हती. आमच्या मागणीला कोणताही उशीर झाला नव्हता. निवडणूक (Election) अधिकारी चुकीची मांडणी करत असून, त्याला देखील आमची हरकत आहे", असेही अमोल कीर्तिकर यांनी म्हटले. पुढे कॅमेऱ्यात बोलायला लावले. ते देखील सांगितलं. पण ज्यांनी आक्षेपार्ह कृत्य केले आहे, तेच आता पत्रकार परिषद घेत आहे, असे अमोल कीर्तिकर यांनी म्हटले.

आम्हाला 19 व्या फेरीपासून संशय येत होता. आम्ही अधिकाऱ्यांना विचारायला जायचो. तेव्हा ते उत्तर देत नव्हते. मोबाईल पंडिलकर यांचा नसून, तो गुरव नावाच्या व्यक्तिचा आहे. तो वापर सरकारी अधिकारी करतो आहे. यामुळे सर्व काही 'कन्फ्युजन' आहे.

यामुळेच आम्ही मतमोजणीची मागणी केली. ज्यापद्धतीने ती फेटाळण्यात आली तिथे संशय बळावतो. तिथे नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. सुरूवातीला देतो, असे सांगून आठ दिवस घेतले. यानंतर आम्हाला लेखी कळवत देता येणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे सर्व काही संशयास्पद आहे. या सगळ्यांच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत, असे अमोल कीर्तिकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT