Amrit Sagar Milk election result news update sarkarnama
मुंबई

Amrit Sagar Milk election result : महाविकास आघाडीचा धुव्वा ; पिचड पिता-पुत्रांनी सत्ता राखली

Amrit Sagar Milk election result : दूध संघावर पूर्वी वैभव पिचड हेच अध्यक्ष होते.

सरकारनामा ब्युरो

Amrit Sagar Milk election result : : नगर जिल्ह्यातील महत्वाच्या असलेली अमृत सागर दूध संघाच्या (Amrit Sagar Milk election result) निवडणुकीच्या निकालात पिचड पिता-पुत्रांनी सत्ता राखली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलला धूळ चारत माजी आमदार वैभव पिचड (Vaibhav Pichad) यांच्या पॅनलने विजय मिळविला. त्यांच्या पॅनलने 15 पैकी 13 जागांवर विजय मिळविला.

या निवडणुकीत पंधरा जागांसाठी 30 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर मतदार अवघे 130 होते.काल (रविवारी) सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया संपली. त्यानंतर लगेच मतमोजणी झाली. या दूध संघावर पूर्वी वैभव पिचड हेच अध्यक्ष होते.

पिचडांच्या शेतकरी समृद्धी मंडळ पॅनलमधील विजयी उमेदवार-अनुसूचित जाती जमाती वैभव मधुकरराव पिचड, भटक्या विमुक्त जाती जमाती बाबुराव शंकर बेनके, इतर मागासवर्गीय आनंदराव रामभाऊ वाकचौरे, तर महिला राखीव अश्विनी प्रवीण धुमाळ, सुलोचना भाऊसाहेब औटी, सर्वसाधारण गट आप्पासाहेब दादापाटील आवारी, रामदास किसन आंबरे, अरुण दिनकर गायकर, बबन किसन चौधरी, सुभाष सूर्यभान डोंगरे, जगन वसंत देशमुख, गंगाधर गणपत नाईकवाडी, रावसाहेब रामराव वाकचौरे हे विजयी झाले. महाविकास आघाडीच्या विकास मंडळाकडून शरद कारभारी चौधरी व गोरक्ष गणपत मालुंजकर हे सर्वसाधारण गटातून विजयी झाले.

अगस्ती सहकारी साखर कारखाना व राजूर ग्रामपंचायत निवडणुकीत गेल्या वर्षी पिचड पिता-पुत्रांना चाळीस वर्षांची सत्ता गमवावी लागली होती. त्यामुळे अमृत सागर दूध संघाची निवडणूक जिंकून पिचड पिता पुत्रांचे राजकीय अस्तित्व संपविण्याचा रणनीती महाविकास आघाडीने आखली होती. मात्र या निवडणुकीत राजकीय डावपेच खेळत पिचडांनी सत्ता राखली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT