Mahavitaran News : शिंदे-फडणवीस सरकार देणार जनतेला 'या' दरवाढीचा 'शॉक'?

Mahavitaran News : याचिकेद्वारे प्रतियुनिट ७५ पैसे ते १.३० रुपये दरवाढ करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
Mahavitaran News
Mahavitaran Newssarkarnama
Published on
Updated on

Mahavitaran News : : राज्यात बेरोजगारीसह अन्य समस्या असताना जनतेचा रोष थांबविण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार सावधानपणे पावलं टाकत आहेत. आगामी नगरपालिका, स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकार जनतेला वीजदरवाढीचा 'शॉक'देणार का ? याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

राज्यातील नागरिकांना नव्या वर्षात वीजदरवाढीचा 'शॉक' बसण्याची शक्यता आहे. महावितरण कंपनीकडून राज्य नियामक आयोगाकडे वीजदरवाढीसंदर्भात याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे प्रतियुनिट ७५ पैसे ते १.३० रुपये दरवाढ करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Mahavitaran News
Eknath Shinde News : शरद पवारांच्या टीकेवर मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सडेतोड उत्तर..

महसुली विभागनिहाय जाहीर सुनावणीनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.मार्चपासून ही दरवाढ होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे.

महावितरण कंपनीने सरासरी २ रुपये ३५ पैसे प्रति युनिट वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगापुढे सादर करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे ग्राहकांना लवकरच दरवाढीचा ‘शॉक’ बसण्याची शक्यता आहे. महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे.वीज दरवाढीचा फटका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसणार नाही, याची काळजी राज्य सरकार घेत आहे.

Mahavitaran News
Maratha Kranti Morcha : राज्यपालांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाने आखली 'ही' रणनीती

काय आहे प्रस्ताव

तीन कंपन्यांचा दरवाढीचा प्रस्ताव आहे. त्यांचा दरवाढ मान्य झाल्यास वीज पुरवठय़ाचा सरासरी दर अकरा रुपये प्रति युनिटवर जाण्याची भीती असून ही दरवाढ सुमारे ५१ टक्के असेल. या प्रचंड दरवाढीने जनतेचा रोष निर्माण होण्याची शक्यता असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता राज्य सरकारला हस्तक्षेप करावा लागणार आहे. गेल्या काही काळात खर्चात वाढ झाल्याने महानिर्मिती कंपनीने सरासरी प्रति युनिट १.०३, तर महापारेषण कंपनीने ३२ पैसे असा एकूण १.३५ रुपये प्रति युनिट दरवाढीचा प्रस्ताव आधीच सादर केला आहे. तिन्ही कंपन्यांनी मिळून प्रति युनिट ३.७० रुपये दरवाढीची मागणी केली आहे. ही दरवाढ सुमारे ५१ टक्के इतकी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com