Amruta Fadnavis
Amruta Fadnavis Sarkarnama
मुंबई

Amruta Fadanvis : "अक्कल कमी, जीभ लांब" ; अमृता फडणवीसांवर काँग्रेसचा निशाणा

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Assembly Live : महापुरुषांबाबत केलेल्या विधानांवरुन महाराष्ट्रात भाजप नेत्यांविरुद्ध टीकेची झोड उठली असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पती अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांच्या नव्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. (Amruta Fadnavis latest news)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे भारताचे नवे राष्ट्रपिता (father of the nation)आहेत. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) हे तत्कालीन राष्ट्रपिता होते, असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं आहे. अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे आयोजित 'अभिरूप न्यायालयात' त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आज (गुरुवारी) पुण्यात अमृता फडणवीस यांचा निषेध करण्यात आला.

अमृता फडणवीस यांच्या विधानाचे पडसाद राज्यात उमटायला सुरवात झाली आहे. पुण्यातील गुडलक चौकात काँग्रेसकडून अमृता फडणवीस यांच्याविरोधात महिलांनी घोषणाबाजी करीत त्यांचा निषेध केला. "अक्कल कमी, जीभ लांब" अशा घोषणा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्या. "अक्कल कमी, जीभ लांब" या मजकुराचे फोटो काँग्रेसकडून यावेळी लावण्यात आले.

"अमृता फडणवीस यांना मेंदूच्या सर्जरीची गरज होती, पण त्यांनी तोंडाची सर्जरी केली. त्यामुळे राष्ट्रपिता आणि राष्ट्रविक्रेता यातला फरक त्यांना कळलं नाही" अशी टीका महिला काँग्रेस कडून करण्यात आली.

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देताना अमृता फडणवीस यांनी भारताचे नवे राष्ट्रपिता असा उल्लेख करता गौरोद्गार काढले. नरेंद्र मोदी भारताचे राष्ट्रपिता आहेत तर महात्मा गांधी कोण आहेत, असा प्रतिसवाल मुलाखतकर्त्याने अमृता फडणवीस यांना केला. त्यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, महात्मा गांधी हे आपल्या देशाचे राष्ट्रपिता आहेत. तर नरेंद्र मोदी हे देखील भारताचे नवे राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे तत्कालिन राष्ट्रपिता होते, असं देखील अमृता यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT