Prithviraj Chavan, Nana Patolo News Sarkarnama
मुंबई

Prithviraj Chavan News : पृथ्वीराज चव्हाणांनी वाढवले पटोलेंचे टेन्शन; थोरातांच्या वादानंतर...

Congress News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद सुरु आहे.

सरकारनामा ब्यूरो

Prithviraj Chavan News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद सुरु आहे. विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर शिक्षक मतदारसंघात आमदार सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन वाद सुरु झाला होता. या वादानंतर कॉंग्रेसमध्ये मोठे राजकीय नाट्य घडले आहे. यावर माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी भाष्य केले आहे.

कॉंग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी प्रदेशाध्य नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर नाराजी व्यक्त करत पक्षश्रेष्टींना पत्र पाठवले आहे. तसेच काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. थोरात यांच्या नाराजीची दिल्लीमध्ये गंभीर दखल घेतली गेली आहे. त्यामुळे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील थोरात यांची भेट घेणार आहेत.

या सगळ्या घडामोडीनंतर काँग्रेस पक्षामध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची चर्चा आहे. त्याला पृथ्वीराज चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे. "रायपुरमध्ये कांग्रेसचे अधिवेशन होणार आहे. त्यानंतर राज्यात संघटनात्मक बदल होतील, असे सुचक वक्तव्य चव्हाण यांनी केले. हे वाद मोठे आहेत असे मला वाटत नाही. मात्र, पक्षातील लोकांनी जाहीर वक्तव्य टाळायला पाहिजे, असे सांगत त्यांनी काँग्रेस नेत्यांचे कान टोचले.

पक्षांचे काम करताना समन्वय पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला. काँग्रेसची हक्काची जागा गमावली, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी चव्हाण यांनी उद्योजक गौतम अदानी यांच्यावर हिडेनबर्गने केलेल्या आरोपांवरही मोठे विधान केले. यामध्ये त्यांनी "हिडनबर्ग रिसर्चने इतिहासातील सर्वात मोठा फ्रॅाड केल्याचा आरोप अदानी समूहावर केला आहे. यावर अदानी समूहाने अमेरिकेत अब्रूनुकसानीचा दावा करायला पाहीजे, असे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT