Anand Paranjpe, jitendra awhad Sarkarnama
मुंबई

Anand Paranjpe on Jitendra Awhad'आव्हाडांनी पवार कुटुंबातील नात्यांवर आपली राजकीय पोळी भाजू नये'

Thane Loksabha Election News : भाजपचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानपूर्वक जागा सोडतील असे आशादायी उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी व्यक्त केले.

Pankaj Rodekar

Thane News on Loksabha Candidate : रक्ताची नाती म्हणजेच कुटुंब नव्हे, 2 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपली वेगळी राजकीय भूमिका जाहीर केली तेव्हा आमच्यासारखे लाखो राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एक कुटुंब म्हणून अजितदादांबरोबर उभे राहिले आहेत. बारामतीतील जनताही ठामपणे अजितदादांच्या मागे उभी आहे. जितेंद्र आव्हाड यांनी पवार कुटुंबातील नात्यांवर आपली राजकीय पोळी भाजू नये. भाजपचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानपूर्वक जागा सोडतील, असे आशादायी उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी व्यक्त केले.

रक्ताची नाती म्हणजेच कुटुंब नव्हे 2 जुलैला माननीय अजितदादा पवार यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली, त्यावेळी महाराष्ट्रातील आम्ही तमाम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्यावर विश्वास ठेऊन त्या भूमिकेशी संलग्न होऊन आम्हीदेखील कुटुंब म्हणून माननीय अजितदादांबरोबर उभे राहिलो. बारामतीची जनता हीदेखील अजितदादांचे ( Pawar Family ) कुटुंब आहोत आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये हे कुटुंब संपूर्णपणे अजितदादांच्या मागे उभे राहिलेले दिसेल. अजितदादांनी बारामतीमध्ये ही शंका उपस्थित केली होती की, मी आणि माझ्या परिवाराला पवार कुटुंबामध्ये एकटे पाडले जाईल, आमच्यावर टीका होईल. पण महाराष्ट्रातील तमाम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे अजितदादांचे कुटुंब आहे. हे त्यांच्यामागे खंबीरपणे उभे आहे. माझी जितेंद्र आव्हाड (jitendra awhad news) यांना विनंती आहे की, पवार कुटुंबातील नात्यांवर आपली राजकीय पोळी भाजू नका. आपल्या कुटुंबामधील आपले कौटुंबिक संबंध अधिक वृद्धिंगत कसे होतील, याच्याकडे त्यांनी अधिक लक्ष द्यावे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad  हे, शरदचंद्र पवार Sharad Pawar यांच्यापेक्षा मोठे समजतात आता पवार यांची चूक काढण्याएवढे ते मोठे झाले असतील तर माहीत नाही, याचा प्रत्यय भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने नुकताच आला. एकीकडे म्हणायचे पवार माझा बाप आहे आणि त्याच बापाचा फोटो यात्रेच्या बॅनरवर नव्हता तर या बॅनरवर राहुल गांधी व स्वतःचा फोटो होता. बापाचा फोटो नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल Praful Patel , प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे Sunil Tatkare या तिघांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये जेवढ लोकसभेच्या loksabha Election जागा मिळतील, या सगळ्या जागांवर महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीचा उमेदवार घड्याळ चिन्ह घेऊन विजयी होईल हा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा संकल्प व मानस आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी NCP एनडीएचा घटक पक्ष आहोत.

महाराष्ट्रात महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही एकत्रित लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत. महायुतीच्या कार्यकर्त्यांचा हाच संकल्प आहे की, 45 प्लस खासदार महाराष्ट्रातून निवडून गेले पाहिजेत. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे आहे. भारतीय जनता पार्टीचे (BJP) दिल्लीतले नेतृत्व अमित शाह, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे हे चर्चा करत आहेत. राष्ट्रवादीला (NCP) लोकसभेमध्ये महायुतीतील सन्मानजनक जागा लढायला मिळतील.

येणाऱ्या दोन-तीन दिवसांमध्ये आम्हाला मिळणाऱ्या जागांची घोषणा होईल. ठाणे जिल्ह्यातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना ( Shivsena ) व राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षाचे, ठाणे, भिवंडी व कल्याण लोकसभेमधील समन्वयक म्हणून तिन्ही पक्षांनी मला नेमलेले आहे. महायुतीच्या Mahayuti भिवंडीतील उमेदवाराचे नाव घोषित झाले असून, कल्याण आणि ठाण्याचे नाव घोषित होईल. त्यांना अधिक मताधिक्याने लोकसभेत पाठवायचे ही जबाबदारी आम्ही पार पाडणार आहोत. लोकसभेचे मतदान पाच टप्प्यांमध्ये आहे. शेवटचा टप्पा आपल्याकडे 20 मे ला आहे. पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती निभावण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रदेश प्रवक्ते परांजपे यांनी सांगितले.

Edited By : Rashmi Mane

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT