Vijay Shivtare News : "ते त्यांच्या कर्मानं मरतील, आपण पराभवाचे धनी नको व्हायला", शिवतारेंनी सांगूनच टाकलं...

Vijay Shivtare On Ajit Pawar : "आता अजित पवारांना माझा अवाका माहिती पडेल," असं म्हणत शिवतारेंनी एकप्रकारे ललकारलं आहे.
ajit pawar vijay shivtare eknath shinde
ajit pawar vijay shivtare eknath shindesarkarnama
Published on
Updated on

शिवसेना नेते, माजी आमदार विजय शिवतारे ( Vijay Shivtare ) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्याविरोधात मोर्चा काढला आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्या पार्श्वभूमीवर विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांची भेट घेत चर्चा केली. या भेटीनंतरही शिवतारेंनी बारामती लोकसभा मतदारसंघातून लढण्यावर ठाम असून, अजित पवारांना लक्ष्य करण्याचं सुरूच ठेवलं आहे.

ajit pawar vijay shivtare eknath shinde
Ajit Pawar On Vijay Shivtare : "बदला घेण्याची वेळ आलीय", शिवतारेंचा इशारा अन् अजित पवार म्हणाले...

'युतीधर्म आपल्याला पाळायला हवा,' असं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितल्याचं शिवतारेंनी ( Vijay Shivtare ) म्हटलं. तसेच, मी बारामतीतून लढलो नाही, तरीही अजित पवार निवडून येणार नाहीत, अशी दर्पोक्ती शिवतारेंनी केली. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"महायुतीचा उमेदवार बारामतीत पराभूत होणार"

"अजित पवारांना विरोध करण्याची कुणाची हिंमत नाही. सततची सत्ता आणि सत्तेतून मिळालेली अराजकता मोडण्याची जनतेची इच्छा आहे. त्यामुळे मी बारामतीतून उभे राहणं गरजेचं आहे. त्यातून चांगला निकाल येऊन शकतो. मी बारामतीतून लढलो नाही, तरी अजित पवार निवडून येणार नाहीत. महायुतीचा उमेदवार तिथे पराभूत होणार आहे. आपण याचा विचार करावा, असं मुख्यमंत्र्यांना मी म्हटलं. त्यावर 'त्यांचं काय आपपासांत व्हायचं होऊद्या. ते ( अजित पवार ) त्यांच्या कर्मानं मरतील. आपण त्यांच्या पराभवाचे धनी नको व्हायला,'" असं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचा दावा शिवतारेंनी केला.

ajit pawar vijay shivtare eknath shinde
Vijay Shivtare On Ajit Pawar : "देवाची शपथ घेऊन सांगतो, अजित पवार बारामती जिंकणार नाहीत," शिवतारेंची दर्पोक्ती

"लोकांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेणार"

"ही लढाई पवार विरुद्ध सामान्य जनता अशी आहे. हा एक ऐतिहासिक असा क्षण आहे. मला थांबवू नका, असं मुख्यमंत्र्यांना मी म्हटलं. पण, 'युतीधर्म पाळायला हवा,' असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे लोकांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेणार," अशी माहिती शिवतारेंनी दिली.

"राजकीय अपप्रवृत्ती संपवण्यासाठी दंड थोपटले"

"आता अजित पवारांना माझा अवाका माहिती पडेल. मी छोटा माणूस आहे, मग अजित पवार मला का घाबरत आहेत. मग आता एवढं का तडफडत आहेत. मी राजकीय अपप्रवृत्ती संपवण्यासाठी दंड थोपटले आहेत," असंही शिवतारेंनी म्हटलं.

R

ajit pawar vijay shivtare eknath shinde
Vijay Shivtare On Ajit Pawar : विजय शिवतारे बारामतीतून लढण्यावर ठाम, अजितदादांवर केली आगपाखड

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com