BJP Sarkarnama
मुंबई

अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध होणार? : दिल्लीहून आलेल्या नेत्याने घेतली फडणवीसांची भेट; भाजपच्या बैठकांना वेग

दिल्लीहून आलेले पक्षाचे राष्ट्रीय सचिव सी. टी. रवी यांनी सकाळीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर भाजप नेत्यांच्या बैठकांना वेग आला आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अंधेरी (Andheri) पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक (by-election) बिनविरोध करण्याची भूमिका मांडली. त्यानंतर राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. दिल्लीहून आलेले पक्षाचे राष्ट्रीय सचिव सी. टी. रवी यांनी सकाळीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. त्यानंतर भाजप (BJP) नेत्यांच्या बैठकांना वेग आला आहे. (Andheri by-election will be uncontested? : BJP meetings in presence of leader from Delhi)

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात थोड्याच वेळात एक बैठक होणार आहे, त्यात मुरजी पटेल यांना माघार घायला लावायची की निवडणूक लढायची, याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र,या पोटनिवडणुकीवरून भाजपमध्ये दोन मतप्रवाह असल्याचे दिसून येत आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि मुरजी पटेल यांचे समर्थक निवडणूक लढविण्याच्या विचाराचे असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे फडणवीस आणि इतर नेते सर्वपक्षीय नेत्यांच्या आवाहनाचा विचार करत आहेत.

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, पक्षाचे राष्ट्रीय सचिव सी. टी. रवी व इतर नेत्यांच्या उपस्थितीत भाजपच्या दादर कार्यालयात बैठक सुरू आहे. तत्पूर्वी मुंबईत दाखल झाल्यानंतर सचिव रवी यांनी प्रथम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर रवी आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.

दरम्यान, भाजपच्या या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे. त्यात राज ठाकरे, प्रताप सरनाईक यांचे पत्र आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या आवाहनाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. या दोघांमध्ये चर्चा होऊनच भाजप निवडणूक लढविण्याबाबत निर्णय घेणार आहे.

अंधेरी पोटनिवडणूक लढविण्याबाबत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि मुरजी पटेल यांचे समर्थक आग्रही आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेते बिनविरोध निवडीच्या परंपरेचा दाखला देत अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी का याबाबतचा विचारविनिमय सुरू आहे, असे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT