फडणवीसांच्या सूचनेनुसारच अभिजित पाटलांच्या नेतृत्वाखालील ‘विठ्ठल’ला मदत केली : दरेकर

अभिजीत पाटील यांचा साखर उद्योगातील दांडगा अनुभव आहे. त्यांच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांची समाजाला जशी गरज आहे, तशीच ती आम्हाला देखील आहे. ते आमच्यासोबत असतील, ते कुठेही जाणार नाहीत
Pravin Darekar-Abhijeet Patil
Pravin Darekar-Abhijeet PatilSarkarnama

पंढरपूर : शेतकऱ्यांच्या बंद पडलेल्या सहकारी संस्था पुन्हा चालू करण्यासाठी जर प्रामाणिकपणे प्रयत्न केले जात असतील तर त्यासाठी आम्ही नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. विठ्ठल सहकारी कारखाना सुरु करण्यासाठीही कोणतीही राजकीय पार्श्वभूमी न पाहता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांच्या सूचनेनुसार मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून कारखान्याला ५० कोटी रुपयांची आर्थिक मदत केल्याचे सांगत, यापुढे ही विठ्ठल कारखान्याच्या मदतीसाठी राज्य सरकार आणि मुंबई सहकारी बॅंक नेहमीच अभिजीत पाटलांच्या (Abhijeet Patil) मागे खंबीरपणे उभे असेल, असे आश्वासन मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी दिले. (50 crore aid to Vitthal Sugar Factory as per Fadnavis' instructions : Pravin Darekar)

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या ४१ वा गळीत हंगामाचा रविवारी (ता. १६ ऑक्टोबर) आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमास बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील, साखर आयुक्त शेखर गायकवाड, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, उपाध्यक्षा प्रेमलता रोंगे, स्वेरीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बी. पी. रोंगे आदी उपस्थित होते.

Pravin Darekar-Abhijeet Patil
काँग्रेस अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून ५६१ प्रतिनिधी करणार मतदान

आमदार दरेकर म्हणाले की, राज्यातील सहकार चळवळ वाढावी आणि ती टिकावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पण, काही मंडळी सहकारी साखर कारखाने मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांच्या मालकींचे सहकारी साखर कारखाने बंद पाडायचे आणि तेच कारखाने आपल्या बगलबच्च्यांच्या नावाने खरेदी करायचे, असे अनेक धंदे सुरु आहेत. परंतु आम्ही सरकारच्या आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या माध्यमातून राज्यातील अनेक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना मदत केली आहे.

Pravin Darekar-Abhijeet Patil
शहाजीबापू पाटलांचा विधानसभेच्या मैदानातून पळ? विधान परिषदेवर पाठविण्यासाठी भाजप नेत्याला साकडे

विठ्ठल कारखाना आर्थिक अडचणीत आल्यामुळे कोणतीही बॅंक कारखान्याला कर्ज देण्यास तयार नव्हती. परंतु सभासद शेतकऱ्यांचा हा कारखाना सुरु व्हावा, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार मुंबई बँकेने कारखान्याला ५० कोटींचे कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. अभिजीत पाटील हे कारखाने चांगले चालवतात. घेतलेले कर्जही ते वेळेत भरतात. त्यामुळे त्यांच्यावर आमचा विश्वास असल्याचेही त्यांनी आमदार दरेकर यांनी सांगितले.

Pravin Darekar-Abhijeet Patil
राज ठाकरेंच्या भेटीचे कारण खुद्द मुख्यमंत्री शिंदेंनीच सांगितले...

अभिजीत पाटील यांचा साखर उद्योगातील दांडगा अनुभव आहे. त्यांच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांची समाजाला जशी गरज आहे, तशीच ती आम्हाला देखील आहे. ते आमच्यासोबत असतील, ते कुठेही जाणार नाहीत, असेही आमदार दरेकर यांनी स्पष्ट केले.

Pravin Darekar-Abhijeet Patil
राज्यातील हजारो मराठी शाळा बंद करण्याचा ईडी सरकारचा घाट : अजित पवारांचा आरोप

मागील तीन वर्षांपासून बंद असलेला विठ्ठल साखर कारखाना या वर्षी सुरु करण्यात यश मिळाले आहे. निवडणुकीदरम्यान सभासदांना जी आश्वासने दिली होती. त्यातील सभासदांचे थकीत ऊस बिल दिले आहे. कामगारांचाही थकीत पगार दिला आहे. येत्या काळात विठ्ठल कारखान्याचे गेलेले वैभव परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. या वर्षीच्या गाळप हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सुमारे १५ लाख टन उस उपलब्ध आहे. त्यातील किमान १२ लाख टन ऊस गाळपाचे करण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे. यासाठी ऊस तोडणीची यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. कोणत्याही सभासदाचा ऊस गाळपाविना शिल्लक राहणार नाही. रस आणि ज्युस गटारीत वाहून जाणार नाही, याची काळजी सुरवातीपासून घेण्यात आली आहे. कारखान्याचा साखर उतारा ११ टक्के मिळण्यासाठी प्रय़त्न आहेत. सभासदांनी आपला संपूर्ण ऊस विठ्ठल कारखान्याला गाळपासाठी दिला, तर यावर्षीच्या हंगामात २ हजार ५०० रुपयांपेक्षा अधिकचा दर देऊ, असेही कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी प्रस्ताविकात सांगितले.

अभिजीत पाटील हेच औदुंबरअण्णांचा वैचारिक आणि राजकीय वारसदार

(कै.) औदुंबर पाटील यांनी अत्यंत मेहनतीने आणि काटकसरीने विठ्ठल कारखान्याची उभारणी केली. त्यांच्यानंतर मात्र कारखान्याची वाताहात झाली. मागील तीन वर्षे तर कारखाना बंद पडला. औदुंबर पाटील यांनी या कारखान्याचे नाव आणि वैभव महाराष्ट्रभर केले होते. अधिकचा ऊसदर देण्यासाठी ते नेहमी प्रय़त्नशील असत. परंतु मध्यंतरी काही चुकीच्या लोकांच्या हातामध्ये कारखाना गेला आणि बंद पडला. बंद पडलेला कारखाना पुन्हा सुरु करण्यासाठी अभिजीत पाटील या तरुणाच्या हाती कारखाना दिला. तीन महिन्यात अभिजीत पाटील यांनी कारखाना सुरु करुन दाखवला. औदुंबर पाटील यांचा खरा वैचारिक आणि वारसदार अभिजीत पाटील हे आहेत. त्यांना सभासदांनी ताकद द्यावी असे आवाहन आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com