Anil Parab sarkarnama
मुंबई

अनिल परब चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर; म्हणाले, मी चुकीचे काही केले नाही

मला कशा संदर्भात बोलावले ते सांगितले नाही.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) अखेर ईडी (ED) कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यांना ईडीने चौकशीसाठी दुसरे समन्स बजावले होते. त्यानंतर त्यांनी ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला.

ईडी कार्यालयात जाण्याआधी परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, मला आज दुसरे समन्स मिळाले आहे. मी चौकशीला जातो आहे. मी शिवसेना प्रमुख आणि मुलींची शपथ घेतली होती. मी काही चुकीचे काम केले नाही. मी चौकशीला सहकार्य करेण. पण मला कशा संदर्भात बोलावले ते सांगितले नाही. तिकडे गेल्यावर अधिकृत कळेल कशाला बोलावले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित १०० कोटी वसुली प्रकरणासंदर्भात ही चौकशी असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान या आधीही ३१ ऑगस्टला परब यांना याच प्रकरणी चौकशीसाठी ईडी समोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र, तेव्हा काही नियोजित कामासाठी जबाब नोंदवण्यास परब यांनी वेळ मागितला होता. कायदेशीर नोटीसीला कायदेशीर उत्तर देणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, आज पुन्हा एकदा परब यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असल्यामुळे परब ईडी कार्यालयात हजर झाले आहेत.

अनिल परब यांनी पालिका कंत्राटदाराकडून वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप सचिन वाझेने केला होता. तसेच परिवहन विभागातील भ्रष्टाचाराबाबत गजेंद्र पाटील यांनीही ईडीत तक्रार दाखल केली होती. या सर्व प्रकरणात परब यांची चौकशी होण्याची केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT