Mumbai, 15 March : संतोष देशमुख खून प्रकरण विधानसभेपासून मुख्यमंत्री आणि माध्यमांमध्ये सर्वत्र विषय लावून धरणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस हे गेल्या पंधरा दिवसांपासून ‘बॅकफूट’वर गेल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला सतीश भोसले यांच्या प्रकरणामुळे, तर आता आशिष विशाळ याच्या खंडणीप्रकरणामुळे सुरेश धस हे चांगेलच अडचणीत सापडले आहेत. त्यावर स्पष्टीकरण देत त्यातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. मात्र, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मात्र धस यांच्यावर निशाणा साधताना ‘किती खोटेपणा....वाह सुरेश धस’ या शब्दांत टीका केली आहे.
संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याच्या नावाखाली अधिकारी व इतरांना खंडणी मागणाऱ्या आशिष विशाळ (Ashish Vishal) यांचा पर्दाफाश करण्यात आला होता. त्याला भररस्त्यात चोप देण्यात आला होत. त्याने सुरुवातील आपण खंडणी मागत नसल्याचे म्हटलं होतं. मात्र, चोप देताच त्याने आपण देशमुख कुटुंबीयांना मदत करण्यासाठी काही अधिकारी आणि इतरांकडे पैसे मागितल्याची कबुली दिली होती.
दरम्यान, हा आशिष विशाळ हा आपला कार्यकर्ता नसल्याचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी म्हटले होते. मात्र, त्यांनी आज आशिष विशाळ हा आपलाच कार्यकर्ता असल्याची कबुली आमदार धस यांनी दिली आहे. मात्र त्यासोबत असलेले पत्र आपण दिलेले नाही. माझी सही सोपी आहे, त्यामुळे कोणीतरी तो खोडसाळपणा केला असावा, असा दावा धस यांनी केला होता.
आशिष विशाळ आणि आष्टीतील सतीश भोसले ऊर्फ खोक्याभाई याच्या कारनाम्यामुळेही आमदार धस हे बॅकफूटवर गेल्याचे गेल्या काही दिवसांपासून जाणवत होते. त्यावरून त्यांच्यावर टीकास्त्र सोडले जात होते. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही सुरेश धस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्यामुळे धसही अडचणीत आल्याचे बोलले जात आहे.
अंजली दमानिया यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या पोस्टमध्ये दमानिया यांनी म्हटले आहे की, किती हा खोटेपणा .... आधी म्हणे आशिष विशाळशी माझा काही संबंध नाही. पण, पत्र लिहिले, त्यात लिहिले की आशिष विशाळ हा माझा सहकारी आहे. मग पकडले गेल्यावर...पत्र माझे नाही आणि सहीदेखील माझी नाही? वाह सुरेश धस!, अशी टीका धस यांच्यावर केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.