Suresh Dhas: भाजप आमदार सुरेश धस पुन्हा अडचणीत; आधी खोक्या अन् आता...; या धक्कादायक प्रकरणात दिली मोठी कबुली

Suresh Dhas Big Statement On Ashish Vishal : आमदार सुरेश धस यांचा पीए असल्याचं सांगत आशिष विसाळ याने सरकारी अधिकाऱ्यांनाही धमकावलं होतं. तसंच त्यांच्याकडून खंडणीही गोळा केली होती. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचा फोटो डीपीला ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.
Satish Bhosle Suresh Dhas 1
Satish Bhosle Suresh Dhas 1Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. यानंतर देशमुख कुटुंबांना न्याय मिळावा आणि या हत्येप्रकरणातील दोषी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी यामागणीसाठी राज्यभर आक्रोश मोर्चे काढण्यात आले होते. मात्र,या मोर्चांसंबंधी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. हे प्रकरण ज्यांनी गेली तीन महिने उचलून धरली त्या भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी मोठी कबुली दिली आहे.

संतोष देशमुख कुटुंबियांना मदत करायची असल्याचं सांगत आशिष विशाळ याने अनेकांकडून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. तो आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांचा समर्थक असल्याचं बोललं जात होतं. पैसे उकळल्याच्या संतापजनक प्रकारानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी त्याला बेदम चोप दिला होता. आता हा आशिष विशाळ हा आपलाच सहकारी असल्याचं भाजप आमदार सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

जे सुरेश धस गेल्या तीन महिन्यांपासून संतोष देशमुख कुटुंबांना न्याय मिळवून आवाज उठवत आहेत. त्यांनी याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात रान पेटवलं होतं. तसंच आता त्यांचा राजीनामाही झाला आहे. पण त्यांच्या राजीनाम्यानंतर सुरेश धस यांचाही पाय आणखी खोलात चालला आहे. आधी सतीश भोसले (Satish Bhosale) उर्फ खोक्याचं कारनाम्यांनी बॅकफूटला गेलेले सुरेश धस हे आता आशिष विशाळ या त्यांच्या समर्थकामुळेच अडचणीत आले आहेत.

Satish Bhosle Suresh Dhas 1
Maharashtra Politics : 'इथे रोज औरंगजेब जिवंत होतो, सरकारच्या योजना काय?', शरद पवारांच्या आमदारानं सगळंच काढलं

काही दिवसांपूर्वी आमदार सुरेश धस यांनी आशिष विशाळशी माझा कोणताही संबंध नसल्याचं सांगत त्याला आणखी तुडवा,असं विधान करत हात झटकले होते. पण धाराशिवमध्ये आशिष विशाळनं खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली होती. त्याला जरांगे पाटलांच्या समर्थकांनी बेदम चोप दिल्याचंही समोर आलं होतं.

पण आधी हात झटकल्यानंतर सुरेश धस यांनी धाराशिवमधील आशिष विशाळ पैसे गोळा करत होता. तो माझाच सहकारी असल्याचं आमदार धस यांनी म्हटलं आहे. पण त्याने कोणाच्या सांगण्यावरून तिथेे पैसे गोळा केले? तसेच त्याकडे 2 कोटींची एफडी व 18 लाखांची कार कुठुन आली ? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

Satish Bhosle Suresh Dhas 1
Shahajibapu Patil : विधान परिषदेसाठी शहाजीबापूंचे एक पाऊल पुढे; एकनाथ शिंदेंनी सकारात्मकता दाखविल्याचा शिष्टमंडळाचा दावा

आमदार सुरेश धस यांचा पीए असल्याचं सांगत आशिष विसाळ याने सरकारी अधिकाऱ्यांनाही धमकावलं होतं. तसंच त्यांच्याकडून खंडणीही गोळा केली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांचा फोटो डीपीला ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.

एका व्यक्तीला बॅटने मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात चर्चेत आलेला सतीश भोसले उर्फ खोक्या हा भाजपा आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. मारहाण करतानाच व्हिडिओ व्हायरल होऊन चर्चा सुरू असतानाच खोक्याचे अनेक थक्क करणारे , वाहनांत नोटांचे बंडल ठेवणे, सोफ्यावर बसून नोटांचे बंडल आणि पैशाची उधळण, शाळेत भाषण देताना पाय मोडण्याची भाषा, हेलिकाॅप्टर सोबत, असे बरेच व्हिडिओ बाहेर आले.

भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचा पदाधिकारी असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या भाजप आमदार सुरेश धस यांचा समर्थक असल्याने धसांवरही चोहोबाजूने टीका झाली होती. अलिकडे बॅटने मारहाणीच्या घटनेवरुन खुद्द पोलिसांनी भोसले विरोधात गुन्हा नोंद केला. दिलीप ढाकणे यांचे दात पाडल्यावरुनही त्याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. तसेच त्याला प्रयागराजमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्या घरावर वनविभागानं बुलडोझरही फिरवला आहे.तसेच भोसलेला न्यायालयानं सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com