Neelam Gorhe Joins Shinde Group Sarkarnama
मुंबई

Neelam Gorhe Joins Shinde Group: शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय का घेतला? नीलम गोऱ्हेंनी सांगितलं कारण...

Neelam Gorhe Press Conference: नीलम गोऱ्हे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

सरकारनामा ब्यूरो

Shivsena : शिवसेनेला (ठाकरे गट) आज पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचेही काही नेते उपस्थित होते.

नीलम गोऱ्हे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आज सकाळपासूनच सुरू होत्या. त्यानंतर अखेर नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत आपली सविस्तर भूमिका मांडली. तसेच आपण शिंदेंच्या शिवसेनेत का प्रवेश करत आहोत याचे कारणही सांगितले.

नीलम गोऱ्हे नेमकं काय म्हणाल्या?

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात मोठी विकासकामे झाले आहेत. राम मंदिराचे काम, जम्मू कश्मीर मधील कलम ३०७, ट्रिपल तलाख यासह अजून अनेक कामे मार्गी लागले आहेत. तसेच राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना योग्य मार्गावर आहे. महिलांचा प्रश्न आणि देशाचा विकास हा महत्वाचा उद्देश ठेऊनच मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे", असं स्पष्टीकरण नीलम गोऱ्हे यांनी दिलं आहे.

यावेळी त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं की, सुषमा आंधारे यांचे महत्व उद्धव ठाकरेंच्या गटात वाढल्यामुळे आपण नाराज आहात का? यावर उत्तर देत त्या म्हणाल्या, "माझी भूमिका विकासाची आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकास होत आहे. त्यामुळे मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

आमच्या पक्षात नाराजी वेगैरे असं नसतं. जरी नाराजी असली तरी पक्षाचे नेते आल्यानंतर नाराजी विसरतात. अगदी सटर-फटर लोकांमुळं नाराज होण्याची परिस्थिती नाही", असं म्हणत त्यांनी सुषमा अंधारे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT