Pankaja Munde News : "पाठीत खंजीर खुपसण्याचं रक्त.." ; पंकजा मुंडेंचा इशारा कुणाकडे?

Pankaja Munde On Sonia Gandhi Meeting : अकारण माझ्याविरोधात बातम्या पेरले जात आहेत..
Pankaja Munde News :
Pankaja Munde News :Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : भाजपच्या नेत्या व राज्याचे माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज आपल्यासंदर्भात दिल्या जाणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या वृत्तांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. पंकजा मुंडे यांनी काँग्रेस नेत्य सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली अशा आशयाच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या होत्या. यावर जोरदार आक्षेप नोंदवत त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच पाठीत खंजीर खुपसणारंरक्त आपलं नाही, असेही मुंडे म्हणाले.

Pankaja Munde News :
Rohit Pawar on Ajit Pawar : तर ते प्रतिभा आजींना विचारल पाहिजे..; अजित पवारांच्या त्या प्रश्नावर रोहित पवार स्पष्टचं बोलले...

पंकजा मुंडेंनी पत्रकार परिषेदे घेत म्हणाल्या की, "भाजपनं माझं टिकीट नाकारलं असलं तरी, मी पक्षासोबत प्रामाणिक आहे. माझ्या अनेक कार्यक्रमातून मी माझी भूमिका वेळोवेली मांडली. मात्र काल एक बातमी आली की, मी दिल्लीमध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेटे घेतली आणि मी काँग्रेसच्या वाटेवर आहे. मी माध्यमांना सांगते की, एक प्रश्नचिन्ह टाकून तुम्ही एखादी बातमी टाकू शकता. पण अशा प्रकारच्या बातम्या दिलेल्या चँनेलवर मानहाणीचा दावा ठोकणार आहे, त्यांनी जे कथन केलेलं आहे, त्याचे पुरावे त्यांना कोर्टात सादर करावे लागतील. "

"माझं आजवरचं राजकीय करीअर कवडीमोलाचं नाही. आजपर्यंत मी २० वर्षे राजकारणात काम करत आहे. माझ्यावर वडील गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. पाठीत खंजीर खुपसण्याचं रक्त माझ्या अगात दौडत नाही," असाही सूचक इशारा मुंडेंनी दिला.

मुंडे पुढे म्हणाल्या, "या चर्चा का होतात? यावर मी याआधीही स्पष्टीकरण दिले आहे. मी सारखं सारखं उत्तर देऊ शकत नाही. मी पक्षासोबत कायम आहे. बातमी आली तेव्हा मी आमचे मंत्री भागवत कराड यांच्या यात्रेला झेंडा दाखवला, त्यांचा घरी त्यांचा सत्कार देखील केला."

Pankaja Munde News :
Sharad Pawar News : छगन भुजबळांच्या समाचारासाठी निवडले २० वर्षांपूर्वीचे `ते` ठिकाण!

"माझ्यासाठी माझा पक्षाचं संघटन सर्वात महत्वाचं आहे. भाजपच्या 106 आमदारांच्या मनात काही गोष्टी असतील पण बोलण्याची हिम्मत नाही. पंकजा मुंडे जाहीरपणे सांगते की, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना मी प्रत्यक्ष कधी पाहिलेलं नाही. अशा बातम्यांमुळे मी दुःखी आहे. यावर आता मी न्यायालयीन लढाई लढेन.माझ्या पक्षाला माझ्याबद्दल सन्मान असेल अशी माझी अपेक्षा आहे," असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com