Uddhav Thackeray, Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम जगजाहीर आहे; पवारांच्या पुस्तकातील दाव्याला ठाकरेंचे उत्तर

Sharad Pawar's Book: महाविकास आघाडीवर परिणाम होणार नाही

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray on Sharad Pawar's Book : शरद पवार यांचे 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी (ता. २) झाले. पवारांनी त्यांच्या पुस्तकात महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन वेळाच मंत्रालयात आले, ही बाब पचनी पडली नसल्याचा दावा केला आहे. पवारांच्या या दाव्यावर मी कसे काम केले हे मला माहिती आहे. माझ्या कामामुळेच राज्यातील प्रत्येकाला मी त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य वाटत असल्याचे सांगून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावर अधिक बोलणे टाळले. ठाकरे मोतोश्रीवर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शरद पवारांनी त्यांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले आहे. पवार म्हणतात, "शिवसेनेत फूट पडल्यानंतर राजकारणात सत्ता टिकविण्यासाठी वेळप्रसंगी वेगाने हलचाली कराव्या लागतात. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निर्माण झालेल्या पेचप्रसंगात संघर्ष करायला हवा होता. त्यांनी मात्र माघार घेतली. दरम्यान, कोरोना काळात सर्व नेते फिरून काम करीत होते तर मुख्यमंत्री या नात्याने ठाकरे ऑनलाइन माध्यमातून सर्वांशी संपर्कात होते. तसेच मुख्यमंत्री असूनही ते फक्त दोन वेळा मंत्रालयात आले, ही बाब पचनी पडली नाही."

शरद पवारांच्या (Sharad Pawar) या मतावर उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी ठाकरे म्हणाले की," प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा, बोलण्याचा, सांगण्याचा अधिकार आहे. मी मुख्यमंत्री म्हणून काय केले हे जगजाहीर आहे. माझ्या कामामुळेच महाराष्ट्रातील प्रत्येकाल मी कुटुंबातील एक सदस्य वाटतो. मी कसे काम केले हे मला माहिती आहे. त्यावर जास्त बोलणार नाही. " (Political Short Videos)

दरम्यान, पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पवार अध्यक्षपदावरून पायउतार झाले तर महाविकास आघाडीवर परिणाम होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावर ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष बदलामुळे महाविकास आघाडीवर काहीही परिणाम होणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, "सर्व पक्षांना त्यांचे अंतर्गत व्यवस्थापन करण्याचा अधिकार असतो. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अध्यक्ष बदलासाठी चर्चा सुरू आहे. शरद पवारांच्या निर्णयानंतर त्यांना संपर्क केला नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाविकास आघाडीला (MVA) तडा जाईल अशी कुठलीही गोष्ट घडेल असे वाटत नाही. तसेच आम्हीही महाविकास आघाडीला धक्का बसेल असे कुठलेही काम करणार नाही. आम्ही कुठल्याही एका व्यक्तीला नाही तर वृत्तीला पराभूत करण्यासाठी एकत्र आलो आहे." (Political Web Stories)

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT