Uddhav Thackeray-Anil Parab Sarkarnama
मुंबई

Anil Parab : अनिल परबांनी ‘एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय’ म्हणताच शेजारी बसलेल्या ठाकरेंच्या चेहऱ्यावर हास्य फुलले!

Maharashtra Budget Session : त्याला असं वाटतंय की त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकला आहे. त्याचा तसा समज झाला आहे. हल्ली काय शाल वैगेरे घेऊन म्हणजे समज झालाय. अरे त्यांच्या जिवावर नाही, हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 25 March : माझ्या सोसायटीमध्ये एक नेपाळी वॉचमन आहे, तो अख्खी रात्र ओरडत असतो. जागते रहो आणि त्याला वाटत असतं, त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत. तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय, त्याला असं वाटतंय की त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकला आहे. त्याचा असा समज झाला आहे, अशा शब्दांंत माजी मंत्री अनिल परब यांनी मंत्री नीतेश राणे यांची खिल्ली उडवली. अनिल परब यांनी ‘एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय,’ असा उल्लेख करताच शेजारी बसलेल्या उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

अनिल परब (Anil Parab) म्हणाले, जे लोक आपल्या देशाच्या विरोधात काम करणार असतील, तर मग तो हिंदू असो अथवा मुस्लिम, तो या देशाचा शत्रू आहे. दुर्दैवाने त्यावेळी जे काही बॉम्बस्फोट झाले, ज्या घटना घडल्या, त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे लोक आढळले, म्हणून बाळासाहेब ठाकरे यांची ती वाक्ये, त्यावेळेला होती.

आज काय झालंय. माझ्या सोसायटीमध्ये एक नेपाळी वॉचमन आहे, तो अख्खी रात्र ओरडत असतो. जागते रहो आणि त्याला वाटत असतं, त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत. तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय, त्याला असं वाटतंय की त्याच्यामुळे हिंदू धर्म (Hinduism) टिकला आहे. त्याचा तसा समज झाला आहे. हल्ली काय शाल वैगेरे घेऊन म्हणजे समज झालाय. अरे त्यांच्या जिवावर नाही, हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत. आमच्या तेवढी ताकद आहे, हिंदू धर्म सांभाळायची, असेही आव्हान परब यांनी दिले.

माझ्या धर्माने किंवा मला ज्यांनी शिकवण दिली, त्यांनी हे शिकवलं की स्वतःच्या धर्माचे रक्षण करताना दुसऱ्याच्या धर्मावर जाणीवपूर्वक अन्याय करणार नाही, याची काळजी घ्यायला मला शिकविलेले आहे. त्यामुळे जाती जातींमध्ये तेढ वाढविणे, महाराष्ट्रात मागील काळातील ज्या काही घटना आहेत. त्या घटना तुम्ही सगळ्या बघा. जाती-जातींमध्ये तेढ वाढविण्याचे काम केले जात आहे, असा आरोपही अनिल परब यांनी केला.

ते म्हणाले, ज्या घटनेने मला अधिकार दिले आहेत, त्याची पायमल्ली करण्याचे अधिकार ना विरोधकांना आहेत, ना सत्ताधाऱ्यांना. हा कोणालाच अधिकार नाही. हा आम्हाला राज्य घटनेने दिलेला अधिकार आहे. म्हणून मला राहायचं कसं, बोलायचं कसं. खायचं काय, याचा अधिकार दुसरं कोणी ठरवू शकत नाही. तो माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी बजावणारच. त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचा हस्तक्षेप मान्य नाही आणि तो मान्यही करू नये.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT