Fadnavis Angry in Assembly : ...त्याचा अर्थ सभागृहात बसलेल्या 288 लोकांची काय औकातच नाही; ठाकरेंच्या नेत्याच्या ‘त्या’ कृतीवर फडणवीस भडकले

Maharashtra Budget Session: आपली हक्कभंग समिती किंवा हक्कभंगाची व्यवस्था ही ट्रूथलेस झाली आहे, तिला आता नखंच उरली नाहीत. कारण तीच तीच माणसं रोज सभागृहाचा अपमान करतात. रोज सभागृहाच्या विरोधात बोलतात.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 25 March : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अत्यंत खालच्या दर्जाचं वक्तव्य अथवा कविता झाली. त्या संदर्भात आपण विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल इतकी चर्चा केली. सभागृहाने त्यावर आपलं मत व्यक्त केलं आणि याच सभागृहाला डिवचण्याकरिता ठाकरे गटाच्या एक नेत्या तीच कविता पुन्हा वाचतात. त्याचा अर्थ काय आहे. तुम्ही इथे बसलेल्या 288 लोकांची काय औकातच नाही’ हा त्याचा अर्थ आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला.

स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या कवितेवरून राज्यात गदरोळ माजला. ज्या ठिकाणी हा कार्यक्रम झाला, त्या स्टुडिओची शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. तीच कविता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पुन्हा वाचून दाखवली आहे. तोच मुद्दा मांडत फडणवीसांनी सभागृहाचा अवमान यावरून अंधारेंवर हल्ला केला.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, आपली हक्कभंग समिती किंवा हक्कभंगाची व्यवस्था ही ट्रूथलेस झाली आहे, तिला आता नखंच उरली नाहीत. कारण तीच तीच माणसं रोज सभागृहाचा अपमान करतात. रोज सभागृहाच्या विरोधात बोलतात. मंत्र्यांनी सभागृहात फ्री आणि फेअर काम करू नये, असा त्यांच्यावर दबाव यावा, अशा प्रकारचे वर्तन करतात आणि काहीच होत नाही. हे कसं चालेल. या सभागृहाचा काही सन्मानच राहिला नाही.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : भुजबळ, मुनगंटीवारांच्या मदतीने मी विरोधी पक्षाला ‘त्या गोष्टी’चे ट्रेनिंग देईन; देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा

प्रश्न माझा नाही किंवा ठाकरे गटाच्या त्या नेत्या कोणी मोठ्याही नाहीत, त्यांना शिक्षा करावी, अशी माझी अपेक्षाही नाही. पण, कुठेतरी या सभागृहाचा काय सन्मान आहे, या सभागृहात बसणाऱ्यांचा काही सन्मान आहे.

इकडे संविधानाच्या बाता मारायच्या आणि तिकडे संविधानाने तयार केलेल्या सभागृहाचा रोज अपमान करायचा. सकाळी नऊ वाजता भोंगा वाजवून या सभागृहाबद्दल काहीही बोलायचं. अध्यक्ष महोदय मी आपल्यावर सोडतो. आपण आमचे कस्टोडियन आहात, असे सांगून सभागृहाच्या अवमानाचा विषय मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवला.

फडणवीस म्हणाले, मला आठवतंय या विधानसभेच्या सभागृहाने हिम्मत करून सनदी अधिकाऱ्यालाही जेलमध्ये टाकलेले आहे. या सभागृहात मी अनेक लोकं बघितलेली आहेत, याच दरवाजात राजदंड लावून उभे राहून त्यांना रिप्रिमाईंड आपण केलेले आहे. कुठं गेलं ते सभागृह. आमच्या वैयक्तिक अपमानासाठी या सभागृहाचा उपयोग करू नका. तो होत असेल तर ते अत्यंत चुकीचंं आहे.

Devendra Fadnavis
Prashant Koratkar : कोरटकर तेलंगणात काँग्रेसवाल्यांच्या घरी लपून बसला होता; फडणवीसांनी सत्ताधारी आमदारांच्या तोंडून राज्यापुढे आणले...

आम्हाला या सभागृहात काम करण्यासाठी संरक्षण दिलेले आहे. मला माझ्या ड्रायव्हरने काय केलं म्हणून किंवा मला पोलिसवाला उलटं बोलला म्हणून नका करू. पण ज्यामुळे सभागृहाचा अपमान होतो. सभागृहाला कमी लेखण्याचा प्रयत्न होतोय, त्याच्यावर मात्र कडक कारवाई झाली पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे, असेही फडणवीसांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com