Nana Patole-Vishwajeet Kadam Sarkarnama
मुंबई

Vishwajeet Kadam : पटोलेंना निलंबित करताच विश्वजित कदमांनी भाजपचा विरोधात असतानाच इतिहासच काढला; निलंबनाचे कारणही सांगितले

Assembly Monsoon session 2025 : महायुती सरकारमध्ये ग्रामीण भाग आणि शेतकरी हा विषय जाणीवपूर्वक डावलला जात आहे. शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर आम्ही विधीमंडळात आवाज उठवत असतो. शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी उभा राहत असतो.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 01 July : शेतकऱ्यांविषयी अवमानकारक विधान करणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, आमदार बबनराव लोणीकर यांनी माफी मागावी म्हणून विधानसभेत आवाज उठविणारे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांच्या एक दिवसाच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, त्यामुळे काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले आहेत. याबाबत आमदार विश्वजित कदम यांनी तर भाजप आणि शिवसेनेचा विरोधी पक्षात असतानाच इतिहासच काढला, तसेच व्हिडिओ रेकॉर्डिंग तपासा, असे आवाहन केले आहे. तसेच शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठीच हे कारस्थान सरकारने केले आहे, असा दावाही केला आहे.

आमदार विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) म्हणाले, विधानसभेत आज (ता. ०१ जुलै) काहीही असंविधानिक घडलेले नाही. ज्यावेळी भाजप आणि आता सत्तेत जे लोक आहेत, ते जेव्हा विरोधी पक्षाच्या बाकावर होते. तेव्हा त्यांनी काय काय गोष्टी केलेल्या आहेत. विधीमंडळाचा व्हिडिओ टेपिंगचा सर्व रेकॉर्ड काढावा. किती अरेरावीची भाषा त्यांनी सभागृहाचा पटलावर दुर्दैवाने वापरलेली आहे, हे समजेल.

आज तर आम्ही शेतकऱ्यांसाठी लढत होतो. शेतकऱ्यांचा जो अपमान झाला आहे, शेतकऱ्यांविषयी जे घाणेरडे वक्तव्य केले. त्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवत होतो. पण, सरकारला तेही बघवलं नाही. सरकारला ते लक्षात आलं की शेतकऱ्यांसाठी लढणारे हे जे आमदार आहेत, त्यांना कुठेतरी दाबले पाहिजे; म्हणून सरकारने आज नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर कारवाई केली, असा आरोपही कदम यांनी केला आहे.

विश्वजित कदम म्हणाले, महायुती सरकारमध्ये ग्रामीण भाग आणि शेतकरी हा विषय जाणीवपूर्वक डावलला जात आहे. शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर आम्ही विधीमंडळात आवाज उठवत असतो. शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही उभा राहत असतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्हाला बोलायचं असतं. पण,आम्हाला बोलू दिलं जात नाही.

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, तसेच बबनराव लोणीकर या दोन ज्येष्ठ सदस्यांनी शेतकऱ्यांबाबत जे विचित्र, घाणेरडं वक्तव्य केले, ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचा अपमान केला. त्या संदर्भात नाना पटोले हे सभागृहात सरकारला सांगत होते की, जबाबदार मंत्री आणि जबाबदार आमदार यांनी शेतकऱ्यांबाबत अपमानकारक वक्तव्य करणे योग्य आहे का? शेतकऱ्यांना दुखावणे योग्य आहे का? असे सवालही कदमांनी केले.

शेतकऱ्यांविषयी कोकाटे आणि लोणीकर यांनी अवमानकारक विधान केल्यामुळे सरकारने त्यावर दिलगिरी व्यक्त करायला हवी होती. माफी मागावी लागत होती, तीच मागणी नाना पटोले आणि आम्ही काँग्रेसचे आमदार करत होतो. पण, आमची मागणी मान्य झाली नाही, त्यामुळे आम्हाला सभागृहात आक्रमक पवित्रा घ्यावा लागला, असे आवाहन कदमांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT