Vishwajeet Kadam : अन्यायकारक प्रारूप आराखड्याविरोधात प्रसंगी टोकाची भूमिका घेऊ : आमदार डॉ. विश्वजित कदम

Vishwajeet Kadam Palus Kadegaon News Update : पलूस शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावरून सध्या वाद होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर अन्यायकारक आरक्षणाबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्याचे आमदार डॉ. कदम यांनी म्हटलं आहे.
Vishwajeet Kadam
Vishwajeet KadamSarkarnama
Published on
Updated on

Sangli News : पलूस शहराचा प्रारुप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. पण आता हाच प्रारुप विकास आराखडा वादाच्या भोवऱ्यात आला असून अनेकांच्या जमिनी आरक्षित झाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला असून आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी यावरून अन्यायकारक आरक्षण बाधितांसाठी प्रसंगी टोकाची भूमिका घेईन, असे म्हटले आहे. ते पलूस येथे आरक्षण बाधित शेतकरी, नागरिक व अधिकार्यांच्या संयुक्त बैठकीत बोलत होते.

यावेळी यावेळी गणपतराव पुदाले, संभाजी येसुगडे, दिलिप पाटील, के. डी. कांबळे, संपत फाळके, भिमराव भोरे , राहुल महाजन, भिमराव जाधव, प्रताप गोंदिल, सुग्रीव बुचडे, जगदीश पाटील, विष्णू सिसाळ, दिनकर पाटील व इतर बाधित शेतकरी व नागरीक उपस्थित होते

नव्याने निर्माण झालेल्या राज्यातील सर्व नगरपालिकांचा विकास आराखडा तयार करण्यात आला. पलूस शहराचा देखील विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र या आराखड्यासाठी शेतकरी व इतरांच्या जमिनी, घरे, मालमत्ता, भूखंड आरक्षित करण्यात आले आहे. जे अन्यायकारक असल्याची भावना शेतकऱ्यांसह नागरीकांमध्ये आहे. यावरून शेतकऱ्यांसह नागरीकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

Vishwajeet Kadam
Vishwajeet Kadam : विश्वजित कदम यांनी घेतली शरद पवारांची भेट; काय आहे कारण?

या पार्श्वभूमीवर आज आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी पलूस येथे अन्यायकारक विकास आरखडा रद्द करण्यासाठी आरक्षण बाधित नागरिक, शेतकरी, व्यापारी व संबंधित अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कदम यांनी, राज्य शासनाच्या धोरणानुसार विकास आराखडा तयार करण्यात येतो.

पलूस शहराची वाढती लोकसंख्या, नियम, ध्येयधोरणे व भविष्याचा विचार करून आराखडा तयार करण्यात आला. मात्र, पलूस शहरातील जवळपास 80 टक्के शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षित झाल्या आहेत. काहींची चार - पाच कामासाठी एकाच ठिकाणी आरक्षण पडले आहे. त्यामुळे आरक्षण बाधीतांच्यामध्ये चीड आहे, असंतोष आहे.

Vishwajeet Kadam
Vishwajeet Kadam : विश्वजीत कदमांचा ‘सांगली पॅटर्न’ आता पुण्यातही; तो नेमका कुठे आणि कसा?

शहराचा विकास झाला पाहिजे. मात्र त्यासाठी अन्याकारक जमिनी आरक्षित झाल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत जास्तीत जास्त आरक्षण कमी करण्यासाठी सर्व ते प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदार डॉ. कदम यांनी दिले. तसेच विकास आरखड्याच्या पार्श्वभूमीवर अन्यायकारक आरक्षणाबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, संबंधित अधिकारी यांचेबरोबर चर्चा केली आहे. प्रसंगी त्यांचे बरोबर बैठकही घेऊ. कोणत्याही परिस्थितीत अन्यायकारक आरक्षण कमी करण्यासाठी प्रयत्न करेन. असा विश्वास आमदार डॉ. कदम यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com