Rahul Gandhi On Narendra Modi Sarkarnama
मुंबई

Rahul Gandhi News : 'इंडिया'ची बैठक संपताच राहुल गांधींचं मोदींना ओपन चॅलेंज ; म्हणाले, ''...२०२४ ला भाजपचं जिंकणं अशक्य ! ''

Deepak Kulkarni

Mumbai: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशपातळीवरील २८ पक्षांनी एकत्र येत मोदी सरकारविरोधात उघडलेल्या 'इंडिया' आघाडीची दोन दिवसीय बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीएच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी मोठी रणनीती तयार कण्यात आली.

याचवेळी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना 'ओपन चॅलेंज' दिलं आहे. इंडिया आघाडी एकत्र आल्यामुळे भाजपला आगामी लोकसभा निवडणुका जिंकणे अशक्य असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मुंबईतील 'इंडिया'च्या बैठकीनंतर झालेल्या इंडिया आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले, इंडिया आघाडी एकत्र आली आहेत. काही मतभेद असले तरी आम्ही एकत्र आहोत. आमच्या बैठकीत दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात पहिला इंडिया आघाडीची समन्वय समिती स्थापना, आणि दुसरा म्हणजे जागावाटपाचा निर्णय लवकरात लवकर निकाली काढण्यात येईल. देशातील 60 टक्के लोकांचं प्रतिनिधित्व करणारे इथे बसलेले करताहेत. त्यामुळे आगामी काळात भाजपचं जिंकणं कठीण आहे असाही आत्मविश्वास गांधींनी बोलून दाखविला.

इंडिया आघाडी लोकसभा एकत्र लढणार आहे. तसेच गिव्ह अॅँण्ड टेक विषयानुसार जागावाटपाविषयी आम्ही निर्णय घेऊ. पंतप्रधान मोदी (Narendra Modi) आणि भाजप हे भ्रष्टाचाराचे मोठे घर आहे असल्याचेही गांधी यांनी यावेळी सांगितले. पण इंडिया आघाडी भाजपला पराभूत करेल. खरं काम जे आहे, आघाडीत ते नेत्यांमधील संवाद, या बैठकांमध्ये ते दिसले. एकत्र काम करणं महत्वाचं आहे असेही मत राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केले.

मी नुकताच लडाख दौरा केला.तिथली परिस्थिती पाहिली.लडाखमध्ये जी परिस्थिती आहे ती लज्जास्पद आहे. चीनने आपल्या जमिनीवर कब्जा केला आहे. मीडिया याबाबत काहीच बोलत नाही असेही त्यांनी सांगितले.

तसेच भाजप(BJP) गरीबांचे पैसे उद्योगपतींना देत आहेत.पंतप्रधान मोदी खोटं बोलत आहे नरेंद्र मोदी आणि अदानी यांच्यातील जे नातं आहे, त्यावर मी काल बोललो. 1 बिलियन डॉलर्स भारतातून बाहेर गेला आणि परत आलाय. नरेंद्र मोदी G20 भरवत आहेत. नरेंद्र मोदी यांनी अदानी यांची चौकशी करायला पाहिजे. त्यांनी चौकशी केली नाही तर मिलिभगत असल्याचे स्पष्ट होईल असा टोलाही राहुल गांधींनी मोदींना लगावला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT