Mallikarjun Kharge On Modi : मुंबईतील 'इंडिया'च्या बैठकीनंतर काँग्रेसच्या खर्गेंचा पंतप्रधान मोदींना मराठीतून टोला ; म्हणाले,'' ते खोटे बोल...''

INDIA Meeting News : '' आता मोदी इंडिया आघाडीला धमकावतील, घाबरवतील पण आम्ही घाबरणार नाही...''
Mallikarjun Kharge On Narendra Modi Controversial Statement :
Mallikarjun Kharge On Narendra Modi Controversial Statement :Sarkarnama

Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या काळात मोठे- मोठे भ्रष्टाचार सुरु आहेत. हे सर्वसामान्य जनतेला दिसत नाही. पण भ्रष्टाचार सुरु आहे. गरीबांचा पैसा मोठमोठ्या उद्योगपतींच्या खिशात सरकार मोदी घातला जात आहे. त्याच्याविरोधात लढण्यासाठी एकत्र आलो आहोत.

मोदी भाषणात नेहमी म्हणतात, मी खाणार नाही, आणि कुणाला खाऊ देणार नाही. पण आता त्यांच्या जवळच्या व्यक्तीला तर तेच भरभरुन खायला देत आहेत. आणि जनतेला उपाशी ठेऊन मारत आहे. आता मोदी इंडिया आघाडीला धमकावतील, घाबरवतील पण आम्ही घाबरणार नाही असे सांगतानाच मराठीत एक म्हण आहे, खोटे बोल पण रेटून बोल तसेच मोदी वागत आहे. आणि त्याच्याविरोधात आम्ही लढण्यासाठी एकत्र आलो आहोत असा मराठी भाषेतून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारवर हल्ला चढविला.

Mallikarjun Kharge On Narendra Modi Controversial Statement :
India Alliance PC : 'सबको लाथ अन् मित्रोका विकास' ही भाजपनीती चालू देणार नाही; उद्धव ठाकरेंनी ठणकावले !

इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर शुक्रवारी पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे(Mallikarjun Kharge) यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, महागाई, ,बेरोजगारी कशी कमी करता येईल आणि जे काही पेट्रोल, गॅसचे भाव वाढताहेत त्याविषयी आम्ही एकत्र आलो आहोत. का करणार आहे. पंतप्रधान मोदी १०० रुपये वाढवतात, आणि दोन रुपये कमी करतात. पेट्रोल, गॅसचे दर दुप्पट झाले आहेत. परंतू त्यांनी दोनशेच कमी केले. सातशे तसेच राहिले. म्हणजे काही कमी झाले नाही.

फक्त जे काही दर वाढवले होते. त्यात कमी केले. पण त्यांनी त्यातून लाखो रुपये कमावले. ही गरीबांची चोरी केली आहे. फक्त लोकांना दाखविण्यासाठी दोनशे रुपये करायचे आणि लोकांना दाखवयाचे की, मी गरीबांसाठी काम केले. पण गरीबांसाठी काम करायचं नाही हीच त्यांची रणनीती आहे. ते गरीबांविरोधात काम करतात आणि उद्योगपतींसोबत राहतात.

Mallikarjun Kharge On Narendra Modi Controversial Statement :
Mahayuti Meeting : आम्ही घड्याळाच्या चिन्हावरच निवडणुका लढवणार;तटकरेंनी महायुतीच्या बैठकीतून रणशिंग फुंकले

राहुल गांधीं(Rahul Gandhi)नी आपल्यासमोर कालच एक अहवाल ठेवला, त्यात अदानींची संपत्ती वाढली कशी, ती कुणी वाढवली. आणि आज जवळपास गरीबींच्या जे ७५ हजार कोटी रुपये होते ते अदानींच्या कसे खिशात गेले हे सगळे त्यांनी सांगितले. मोदी सरकारकडून मोठमोठ्या उद्योगपतींना जे काही पैसे जात आहेत त्याविरोधात लढण्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत. गरीबांचा पैसा जो उद्योगपतींच्या खिशात चालला आहे तो रोखण्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहे. आणि इंडिया जिंकणे गरजेचे आहे. इंडिया जिंकण्यासाठीच या व्यासपीठावर एकत्र आले आहेत असेही खर्गे म्हणाले.

तपास यंत्रणांचा अतिशय दुरुपयोग

जे काही ठराव आम्ही तुमच्या समोर ठेवले आहेत, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही बैठका घेऊन, प्रत्येक राज्यात आम्ही जाऊ. जे काही महागाई, बेरोजगारी वाढतेय ती कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु असेही खर्गेंनी सांगितले. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या तपास यंत्रणांचा अतिशय दुरुपयोग या सरकारकडून सुरु आहे. असे आजपर्यंत कधीही झाले नाही. शरद पवारां(Sharad Pawar) नंतर माझा नंबर लागतो. मी सुध्दा जवळपास ५५ वर्षांपासून राजकारणात काम करत आहे. ५२ सालापासून मी आमदार, खासदार, मंत्री राहिलो, पण असे चित्र कधीच पाहिले नाही असा घणाघातही त्यांनी यावेळी केला.

Mallikarjun Kharge On Narendra Modi Controversial Statement :
Nitish Kumar News : देशातील मीडियाने मोदींपासून स्वतंत्र व्हावे ; नितीश कुमारांचे माध्यमांना आवाहन

''...पण मोदींनी त्यावेळी विशेष अधिवेशन बोलावले नाही!''

कोणत्याही मुख्यमंत्र्यांना, विरोधीपक्षांना न विचारता मोदी सरकार (Modi Government) ने विशेष अधिवेशन बोलावले आहेत असा आरोपही त्यांनी केला. ज्यावेळेस मणिपूर ज्यावेळेस जळत होते, त्यावेळेस कधी विशेष अधिवेशन बोलावले नाही. कोविडच्या काळात, चीन आपली जमीन हडप करतोय तेव्हा नाही बोलावले, नोटबंदी जाहीर झाली आणि मजूर, कामगार लोकं मरत होते त्यावेळी नाही बोलावले. ज्या ज्या वेळेस सर्वसामान्य लोकं अडचणीत, संकटात आले त्यावेळी अधिवेशन नाही बोलावले. पण आता का बोलावले जात आहे , हे मला माहित नाही. आजचा अजेंडा त्यांचा माहिती नाही. हे देश चालविण्यासाठी नसून हळूहळू हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे असा हल्लाबोलही खर्गेंनी यावेळी मोदी सरकारवर केला.

माध्यमे त्यांच्यासोबत आहे हे त्यांच्या डोक्यात आहे. आणि आम्हांला ते कधी कधी पाहायला मिळते. म्हणूनच आम्ही त्यांच्या विरोधात, त्यांच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र येत आहोत. त्यांचे जे मोठेमोठे भ्रष्टाचार सुरु आहे जे दिसत नाही. मोदी भाषणात नेहमी म्हणतात, मी खाणार नाही, आणि कुणाला खाऊ देणार नाही. पण आता त्यांच्या जवळच्या व्यक्तीला तर ते खायला देत आहेत. आणि जनतेला उपाशी ठेवत मारत आहे असेही मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com