Rahul Gandhi In India Meeting : राहुल गांधी गेले कुठे ? कुणालाच माहिती नाही; हॉटेलमधून ताफा बाहेर..

Rahul Gandhi In Mumbai : काँग्रेसच्या नेत्यांनाही माहिती नाही, राहुल गांधी गेले कुठे..
Rahul Gandhi In India Meeting :
Rahul Gandhi In India Meeting : Sarkarnama

Mumbai News : काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी हे 'इंडिया' आघाडीच्या बैठकीसाठी राजधानी मुंबईत दाखल झाले आहेत. ग्रँड हयात हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम आहे. आज सकाळीच राहुल गांधी हॉटेलमधून बाहेर निघाले आहेत. आपल्या ताफा सहित ते बाहेर पडले आहेत. पण ते नेमके कुठे गेले आहेत? कुणाची भेट घेणार आहेत? हे मात्र अजूनही स्पष्ट झालेले नाही. (Latest Marathi News)

Rahul Gandhi In India Meeting :
NCP Crisis News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 'RRR' पक्षाला सुपरहीट करणार का? सभांचा लावणार धडाका..

इंडिया बैठकीला थोड्या वेळात सुरूवात होणार आहे. मात्र बैठकीआधीच राहुल गांधी हॉटेलमधून बाहेर पडले आहेत. राहुल गांधींचा शेड्युल याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे राहुल गांधी नेमके गेले कुठे याची काँग्रेस नेत्यांनासुद्धा माहिती नाही. मात्र ते बैठक सुरु होण्याच्या वेळेत पुन्हा हॉटेलवर परततील, असे बोलले जात आहे.

Rahul Gandhi In India Meeting :
Solapur Politics : 'BRS'चा सत्ताधारी भाजपला दणका; सोलापुरात पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे अन् हैद्राबादला रवाना..

बैठकीचा दुसरा दिवस -

भाजपविरोधात एकत्रित आलेल्या इंडिया आघाडीची राजधानी मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस असणार आहे. विशेष बाब म्हणजे आज आघाडीकडून 'लोगो'चं (चिन्ह) अनावरण करण्यात येणार आहे. दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. मोदी सरकार काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे याच अनुषंगाने या 'इंडिया'च्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com