ST Bus Employees Sarkarnama
मुंबई

ST Bus Employees : राज्य सरकारचं एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीआधीच मोठं 'गिफ्ट'

Asha Swayamsevika : आशा स्वयंसेविकांच्या मानधनातही वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला

Ganesh Thombare

Mumbai News : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी तब्बल 387 कोटींची मदत करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

दिवाळी आली की अनेकवेळा एसटी कर्मचाऱ्यांना पगारासाठी कामबंद आंदोलन करण्याची वेळ येत होती. मात्र, या वर्षी सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीआधीच मोठं 'गिफ्ट' दिलं आहे. राज्य सरकार एसटी महामंडळाला मोठी मदत करणार असल्यामुळे पुढील काही दिवसांतच कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आशा सेविकांनाही मोठं 'गिफ्ट'

राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या जवळपास 80 हजारांपेक्षा जास्त आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या आशा स्वयंसेविकांच्या मानधनामध्ये 6,200 रुपयांची मानधन वाढ तर प्रत्येकी दोन हजार रुपयांची दिवाळी भेट देण्यात येणार आहे.

गट प्रवर्तकांनाही मानधन वाढ

महाराष्ट्रात जवळपास 3,664 गट प्रवर्तक कार्यरत आहेत. त्यांना 6,200 रुपये मानधन देण्यात येते. आता राज्य सरकारने 6,200 रुपयांची मानधन वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर गट प्रवर्तकांना केंद्र सरकारही 8,775 रुपये मानधन देते. त्यामुळे यापुढे आता गट प्रवर्तकांना 21,175 रुपये एवढे एकत्रित मानधन मिळणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT