ashish shelar sarkarnama
मुंबई

Ashish Shelar : डीलर आता तुमचे लीडर झालेत का? पत्रकाराच्या प्रश्नावर शेलार संतापले; म्हणाले, "तुम्ही..."

Ashok Chavan Join Bjp : अशोक चव्हाणांनी प्रवेश केल्यानंतर 'आदर्श' घोटाळ्यावरून भाजपला विरोधकांकडून घेरण्यात येत आहे.

Akshay Sabale

अखेर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी मंगळवारी ( 13 फेब्रुवारी ) भाजपत प्रवेश केला. दोन वर्षांपासून चव्हाणांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत चव्हाणांचा पक्षात प्रवेश झाला. पण, 'आदर्श' घोटाळ्यावरून भाजप आणि चव्हाणांवर विरोधकांडून टीका केली जात आहे. त्यातच एका पत्रकारानं मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांना चव्हाणांबाबत एक प्रश्न विचारला. तेव्हा शेलार चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं.

नेमकं काय घडलं?

अशोक चव्हाणांच्या प्रवेशानंतर आशिष शेलार भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर पडले. तेव्हा एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं आशिष शेलारांना 'आदर्श' घोटाळ्यावरून प्रश्नांचा भडीमार केला. तेव्हा, "तुला उत्तर देणार नाही," असं शेलारांनी म्हटलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'तुम्ही विरोधी पक्षात असताना अशोक चव्हाणांविरुद्ध अनेक आंदोलनं केली. 'आदर्श' घोटाळा काढण्यात तुमची भूमिका मोठी होती. आता थेट चव्हाण तुमच्या पारड्यात येऊन बसले आहेत', असा प्रश्न प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं विचारल्यावर शेलार म्हणाले, "खऱ्या अर्थानं न्यायालयीन प्रक्रियेवर भाष्य करणं सोयीचं नाही. विकासपर्वात भाजपबरोबर येणाऱ्याचं आणि ज्याच्यावर आरोप सिद्ध झाले नाहीत, त्यांचं लोकशाही प्रक्रियेत आम्ही स्वागत करू."

'देवेंद्र फडणवीसांनी अनेक प्रचार सभेत चव्हाणांचा उल्लेख डीलर म्हणून केला होता. आता डीलर तुमच्या पक्षाचे लीडर झालेत का?' हा प्रश्न प्रतिनिधीनं विचारल्यावर शेलारांनी संतापत म्हटलं, "ते तुम्ही ठरवणार नाही."

शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी "लीडरबरोबर डील झाली," असं विधान केलं. याबाबत प्रतिनिधीनं प्रश्न विचारल्यावर शेलार म्हणाले, "तुला उत्तर देणार नाही."

दरम्यान, 'आदर्श' घोटाळ्याबाबत अशोक चव्हाणांनासुद्धा पत्रकार परिषेद प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अशोक चव्हाणांनी म्हटलं, "याप्रश्नी उच्च न्यायालयात आमच्या बाजूनं निकाल लागला आहे. काही यंत्रणा निकालाविरोधात गेल्या आहेत. पण, कायदेशीर प्रक्रिया पार पाडू. हा एक राजकीय अपघात म्हणावं लागेल. फार काही चिंतेचा विषय वाटत नाही."

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT