Ashok Chavan In Bjp : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी भाजपत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत चव्हाणांचा पक्षात प्रवेश झाला. या वेळी चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजपचा दुपट्टा अशोक चव्हाणांच्या गळ्यात टाकला. तसेच, भाजप सदस्यत्वाचा फॉर्मही प्रवेशापूर्वी अशोक चव्हाणांनी भरला. "अशोक चव्हाणांच्या प्रवेशामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीला बळ मिळेल," असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "अशोक चव्हाण आणि अमर राजूरकर यांचं भाजपत स्वागत करतो. चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या प्रवेशानं भाजप आणि महायुतीची शक्ती भक्कम झाली असून वाढली आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे भारताला विकसित करण्याचं स्वप्न पूर्णत्वाकडं नेण्याचं काम सुरू केलं आहे. जो बदल आणि परिवर्तन भारतात दिसायला लागला, त्यामुळे आपणही देशाच्या मुख्य प्रवाहात आणि मोदींसारख्या मजबूत नेतृत्वात काम करावं, असं अनेकांना वाटतं."
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!) ु
"देशाला पुढं नेण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. त्यात आपणही वाटा उचलावा अशा प्रकाराचा विचार अनेक नेत्यांमध्ये आला. त्यातले प्रमुख नेतृत्व म्हणून अशोक चव्हाणांकडे बघू शकतो. अशोक चव्हाणांनी भाजपत बिनशर्त प्रवेश केला आहे. 'विकासाच्या मुख्य धारेत योगदान देण्याची संधी मला द्यावी. मला पदाची कुठलीही लालसा नाही,' असं चव्हाणांनी सांगितलं," अशी माहिती फडणवीसांनी दिली.
"अशोक चव्हाण आणि अमर राजूरकर यांचा प्रवेश झाला आहे. लवकरच हजारो कार्यकर्ते आणि नेत्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम निश्चित आयोजित करू. चव्हाणांच्या प्रवेशामुळे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र आणि मराठवाड्यात महायुतीला विशेष बळ मिळेल. याचा आम्हाला निश्चित फायदा होईल," असं फडणवीसांनी म्हटलं.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.