Ashish Shelar, Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

"...तर भाजपचे शिवसेनेला १०० टक्के समर्थन" : शेलारांचे मुख्यमंत्र्यांना आश्वासन

Ashish Shelar | BJP | Shivsena | Mahavikas aaghadi : उद्धव ठाकरे यांनी ताठ मानेनं उभं रहावं, शरद पवार यांच्या दबावापुढे झुकू नये.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक (Nawab Malik) हे सध्या ईडी कोठडीत आहे. २३ फेब्रुवारीला तब्बल ७ तासांच्या चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली असून त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. मलिक यांच्याविरोधात ईडीने मनी लॉंड्रिंगचा ठपका ठेवला आहे. चौकशीदरम्यान अंडरवर्ल्ड आणि मलिक यांचे थेट आणि कमी पैशात जमिनीचे व्यवहार झाले असल्याचे पुरावे सापडले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

मात्र या दरम्यान अटक होवून देखील राजीनामा न घेतल्याने विरोधातील भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. याबाबत भाजपचे नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर जोरदार तोफ डागली आणि मलिक यांचा राजीनामा घेवून त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी केली. देशहितासाठी उद्धव ठाकरे यांनी ताठ मानेने उभे रहावे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दबावापुढे झुकू नये, असा सल्लाही शेलार यांनी दिला.

शेलार पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आता "झुकेंगे नही" हे वाक्य सत्यात उतरवावं. तसेच मुंबई पोलिस आयुक्तांना नवाब मलिक यांच्यासारख्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्या. अजून किती नेत्यांचे दाऊद, त्याची बहिण हिच्याशी आर्थिक व्यवहार आहेत याची चौकशी करा. केंद्रीय यंत्रणांना दहशतवाद विरोधी कारवाईसाठी समर्थन द्याव, अशीही मागणी त्यांनी केली. ते पुढे म्हणाले, देव, देश आणि धर्मासाठी उद्धव ठाकरेंनी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावे. आमची अपेक्षा फक्त त्यांच्याकडूनच आहे, अन्य दोन पक्ष वाया गेले. मुख्यमंत्र्यांनी जर ही भूमिका घेतील तर भाजप १०० टक्के समर्थन देईल, असेही शेलार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना आश्वासन दिले.

आशिष शेलार यांनी यावेळी काही लोक बातम्या दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. पण सत्य सर्वांसमोर आले आहे. इकबाल कासकर आणि दाउदच्या बहिणीवर पहिला एफआयर ठाणे कसाब वडवली पोलिस स्टेशनला १८ सप्टेंबर २०१७ रोजी झाला. त्यामुळे ही राजकीय अटक असा शिमगा केला तरी चालणार नाही. २०१९ मध्ये इकबाल मिर्चीवर एफआयआर झाला. तर ३ फेब्रुवारी २०२२ रोजी एनआयएने दाऊद, छोटा चिकना, टायगर मेनन यांच्यावर तिसरा एफआयआर दाखल केला. त्यामुळे उखाड दिया यांना एवढी तरी बुद्धी असेल तर समाजावे की भाजप २०१७ पासून या दहशतवाद्यांना उखाडत आहे, असेही प्रत्यूत्तर शेलार यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT