यशवंत जाधवांचा पाय खोलात; आणखी एका केंद्रीय यंत्रणेच्या रडारवर

Yashwant Jadhav | Mumbai | Income Tax | अद्यापही आयकर विभागाची टीम जाधव यांच्या घरी तळ ठोकून
Yashwant Jadhav News updates
Yashwant Jadhav News updates Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेना उपनेते आणि मुंबई पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. आयकर विभागाच्या (Income Tax) कारवाईनंतर ते आता कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या देखील रडारवर आले आहेत. एमसीए अर्थात मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सने (MCA) जाधव यांच्याशी संबधित कंपन्यांचा झाडाझडती सुरू केली आहे. तसेच ज्या शेल कंपन्यांच्या मदतीने जाधव यांनी परदेशात पैसे पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे, त्या कंपन्या देखील कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

२५ फेब्रुवारी रोजी सकाळी यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली आहे. तेव्हा पासून सलग ३ दिवसांनंतर देखील ही कारवाई सुरु आहे. अद्यापही आयकर विभागाची टीम जाधव यांच्या घरी तळ ठोकून आहे. शेल कंपन्यांमधील गुंतवणूक, कोविड काळातील भ्रष्टाचाराचे आरोप, जवळपास १५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार आणि हे पैसे युएईकडे वळते केल्याबाबत आयकरकडून जाधव यांची चौकशी करण्यात येत आहे.

Yashwant Jadhav News updates
आक्रमकपणा कायम! नवाब मलिक ईडीला थेट आव्हान देण्यासाठी मैदानात

या कारवाईत आतापर्यंत आयकर विभागाने जाधव यांच्या घरातून २ कोटी रुपये (Income Tax Seizes CASH) जप्त केले आहेत. याशिवाय त्यांचे १० बँक खात्यातील लॅाकर्स जप्त करण्यात आले आहे. एका इंग्रजी दैनिकाने याबाबतचे वृत्त दिले आहे. यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी कोलकाता येथील शेल कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार केल्याचं आयकर विभागाच्या यापूर्वीच्या तपासात समोर आलं असल्याची माहिती आहे. यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शेल कंपन्यांबरोबरच्या व्यवहारातून पैसे कमवल्याचा आरोप आयकर विभागाने केला आहे.

Yashwant Jadhav News updates
सातव्या विमानातुन १८२ जण भारतात; नारायण राणेंनी केले देशवासीयांचे स्वागत

दरम्यान, जानेवारी महिन्यात भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप केला होता. सोबतच आयकर विभागाच्या हाती पुरावे देखील दिले होते. जाधव यांचे पितळ उघडं पाडण्यासाठी आयकर विभागाकडे पाठपुरावा करणार असून त्यांना मदत करणार असल्याचेही सोमय्या म्हणाले होते. ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर जाधव यांच्या घरी छापेमारी झाल्याने शिवसेनेच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com