आक्रमकपणा कायम! नवाब मलिक ईडीला थेट आव्हान देण्यासाठी मैदानात

Nawab Malik | ED | High Court : नवाब मलिक सध्या ईडी कोठडीमध्ये आहेत.
Nawab Malik ED
Nawab Malik ED Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक (Nawab Malik) हे सध्या ईडी कोठडीत आहे. २३ मार्चला तब्बल ७ तासांच्या चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली असून त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. मलिक यांच्याविरोधात ईडीने मनी लॉंड्रिंगचा ठपका ठेवला आहे. चौकशीदरम्यान अंडरवर्ल्ड आणि मलिक यांचे थेट आणि कमी पैशात जमिनीचे व्यवहार झाले असल्याचे पुरावे सापडले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

मात्र कोठडीतून देखील मलिक यांचा आक्रमकपणा कायम असल्याच दिसून येत आहे. कारण मलिक आता थेट ईडीविरोधातच (Enforcement Directorate) कायदेशीर लढाईसाठी मैदानात उतरले आहेत. ईडीने आपल्याविरोधात दाखल केलेला खटला आणि केलेली अटक बेकायदेशीर असून, हा खटला रद्द करण्यात यावा आणि आपल्याला या आरोपांमधून ताबडतोब मुक्त करण्यात यावं, अशी मागणी करत नवाब मलिक यांनी आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Bombay High Court) धाव घेतली आहे.

Nawab Malik ED
सातव्या विमानातुन १८२ जण भारतात; नारायण राणेंनी केले देशवासीयांचे स्वागत

याशिवाय मलिक यांच्या चौकशीमागे राजकीय सुडबुद्धी असल्याचा आरोपही महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. नवाब मलिक किंवा आम्ही जे सातत्याने बोलत आहेत, असत्याचा पर्दाफाश करण्यात येत आहे, मुखवटे काढले जात आहेत, त्यांच्या मागे देशभरामध्ये ईडी, सीबीआय लावले जात आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. दरम्यान नवाब मलिक यांच्यावरील कारवाई सुरु असतानाच आता त्यांचा मुलगा फराझ मलिक यांना देखील ईडीने समन्स पाठविले आहे. फराझ मलिक आजच ईडी कार्यालयात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Nawab Malik ED
कॅडबरीच्या गोडव्याने संपवली जयंत पाटील आणि सदाभाऊ खोतांमधील कटूता!

नवाब मलिक यांची दाऊद इब्राहिम मनी-लाँड्रिंग प्रकरणात सध्या चौकशी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने मुंबईतील काही जमीन व्यवहारांबद्दल अंडरवर्ल्डशी संबंधित इकबाल कासकर आणि हसीना पारकर यांची चौकशी केली होती. त्यानंतर याच प्रकरणाशी संबंधित काही लोकांची ही चौकशी करण्यात आली होती. भाजपचे नेते आणि राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांच्यावर याबाबत आरोप केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com