Current traffic status on Mumbai-Pune Expressway Feb 6, 2026 Sarkarnama
मुंबई

Ashish shelar News : द्रुतगती मार्गावरील अभूतपूर्व वाहतुककोंडीचा शेलारांनी घेतला धसका; थेट फडणवीसांना पत्र, बरंच काही लिहित सांगितला धोका...

Expressway traffic jam Maharashtra : हेलिपॅड उभारल्यास कोस्टल रोड व सी लिंकवरील आपत्कालीन परिस्थितीत जखमींना एअर अँब्युलन्सद्वारे तातडीने हलविता येईल, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

Rajanand More

Devendra Fadnavis letter : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस टॅंकर उलटल्याने अभूतपूर्व वाहतूककोंडी झाली होती. या मार्गावर ३६ तासांहून अधिक काळ प्रवाशांचे अन्न-पाण्याविना हाल झाले. लहान मुलं आणि महिलांची प्रचंड कुचंबणा झाली. त्यावरून सरकारवरही बरची टीका झाली. सरकारची आपत्कालीन यंत्रणा सपशेल फेल ठरल्याचा दावा प्रवाशांकडून करण्यात आला. या गंभीर स्थितीचा धसका राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आहे.

आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या घटनेचे गांभीर्य सांगणारे पत्र लिहिले आहे. तसेच या घटनेतून धडा घेण्याचे सांगत मुंबईसाठी महत्वाची मागणीही केली आहे. शेलार यांनी म्हटले आहे की, पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस टँकर उलटून गंभीर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे आपल्या राज्यातील प्रमुख दळणवळण मार्गांवरील आपत्कालीन व्यवस्थापनाचा विषय चर्चेत आला आहे.

घटनेतून एक महत्वाचा धडा घेणे अत्यावश्यक आहे. भविष्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन वांद्रे–वरळी सी लिंक, वर्सोवा–वांद्रे वरळी सी लिंक तसेच संपूर्ण कोस्टल रोडवरील आपत्कालीन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याची गरज असल्यासे शेलार यांनी पत्रात म्हटले आहे.

महत्त्वाच्या मार्गांवर अपघात, आग किंवा नैसर्गिक आपत्ती घडल्यास तातडीने व प्रभावी प्रतिसाद देणे मोठे आव्हान ठरते,  विशेषतः कोस्टल रोड हा भुयारी व समुद्रावरून जाणारा मार्ग असल्याने जखमींना त्वरित रुग्णालयात हलवणे, सुरक्षा यंत्रणांची जलद हालचाल आणि आपत्कालीन सेवा पोहोचवणे कठीण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर वांद्रे रेक्लेमेशन परिसरात, सी लिंकजवळ हेलिपॅड उभारण्याची मागणी शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

हेलिपॅड उभारल्यास कोस्टल रोड व सी लिंकवरील आपत्कालीन परिस्थितीत जखमींना एअर अँब्युलन्सद्वारे तातडीने हलविता येईल. तसेच लीलावती रुग्णालयासह परिसरातील अन्य प्रमुख रुग्णालयांपर्यंत जलद सेवा देणे शक्य होईल.  यामुळे आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ व इतर यंत्रणांमधील समन्वय अधिक प्रभावी होईल आणि मुंबईसारख्या दाट लोकसंख्येच्या आर्थिक राजधानीसाठी दीर्घकालीन आपत्कालीन आराखडा अधिक मजबूत होईल, असेही शेलार यांनी पत्रात नमूद केले आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT