Aditya Thackeray, Ashish Shelar Latest News Sarkarnama
मुंबई

Ashish Shelar Slams Aaditya Thackeray: 'लबाड लांडगा ढोंग करतोय' ; श्वेतपत्रिकेवरून आदित्य ठाकरेंना शेलारांचा टोला

सरकारनामा ब्यूरो

Mumbai Political News: उद्योगमंत्री उदय सामंत(Uday Samant) यांनी मोठे उद्योग प्रकल्प राज्याबाहेर का गेले, याबाबतची श्वेतपत्रिका काल (गुरुवार) विधान परिषदेत काढली. शिंदे-फडणवीस यांच्या कार्यकाळात उद्योग राज्याबाहेर गेले, यावरून ठाकरे गटाचे नेते, माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले होते. कालच्या श्वेतपत्रिकेवरुन भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.

मुंबईतील पाऊस, कोविड आणि प्रकल्पांवरून आदित्य ठाकरेंवर शेलारांनी टीका केली. "श्वेतपत्रिकेवरुन जे उघड झाले, तेच आम्ही सांगत होतो. वेदांता आणि फॉक्सकॉन हा प्रकल्प महाराष्ट्रात आलाच नव्हता. त्यांच्यासोबत कुठलाही करार झाला नव्हता. तरीही 'ते'(आदित्य ठाकरे) ‘प्रकल्प गेला..प्रकल्प गेला’ असे गळे काढत होते. याचे वर्णन 'लबाड लांडगा ढोंग करतोय' असेच करावे लागेल," असा टोला शेलारांनी लगावला.

"महाराष्ट्राची मागील अडीच वर्षे जी वाया गेली, त्या काळातील कवित्व महाराष्ट्र आजही विसरणार नाही. कोविडबाबत वैज्ञानिक नाही, तर तत्कालीन मुख्यमंत्री तज्ज्ञ होते," असा टोला शेलारांनी लगावला.

श्वेतपत्रिकेबाबत काल उदय सामंत म्हणाले, "सत्तांतराच्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या 'हाय पॉवर' कमिटीच्या बैठकीत वेदांताचा कुठेही उल्लेख नव्हता. त्यात एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 'हाय पॉवर' कमिटीच्या बैठकीत उल्लेख होता. मात्र, एमओयू झाला नव्हता. एअरबसने कधीही अर्ज केला नव्हता,"

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT