Ashok Chavan, devendra Fadanvis  Sarkarnama
मुंबई

Ashok Chavan in BJP : अशोक चव्हाण केंद्रात मंत्री होणार ?

Sachin Deshpande

Ashok Chavan : माजी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा आज भाजपमध्ये पक्ष प्रवेश झाला. या पक्ष प्रवेशानंतर चव्हाण यांना पहिले राज्यसभेवर पाठवित त्यांना केंद्रात मंत्री करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचबरोबर इतक्यावर भाजप थांबणार नाही, तर त्यांच्या मुलीचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

मराठवाड्याचे आणि मराठ्यांचे नेते म्हणून अशोक चव्हाण यांचे नाव समोर आले आहे. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांच्याकडे नेमकी कोणती जबाबदारी देण्यात येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशात त्यांना थेट केंद्रीय मंत्री करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, त्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.(Ashok Chavan will be the Union Minister)

अशोक चव्हाण यांची यशस्वी राजकीय वाटचाल पाहता भाजप त्यांच्या राजकीय अनुभवाचा फायदा घेण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. त्यांना थेट केंद्रात मंत्री करत नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघात अशोक चव्हाण यांची राजकीय वारसदार श्रीजया चव्हाण यांच्या आमदार होण्याची वाट मोकळी होणार आहे. श्रीजया या वकील असून, त्यांची राजकीय कारकीर्द सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत श्रीजया चव्हाण यांना भाजप उमेदवारी देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांच्यावर विश्वास ठेवत भाजपमध्ये आलो, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. प्रामाणिकपणे मी भाजपमध्ये काम करेल. लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा माझा उद्देश असेल, असा दावा चव्हाण यांनी केला. सबका साथ सबका विश्वास हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवत भाजपमध्ये प्रवेश केल्याचे चव्हाण यांनी सांगितले. भाजप जो आदेश देईल तो मी पाळेल, असा विश्वास चव्हाण यांनी आज पक्ष प्रवेशानंतर आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. भाजप (BJP) चे केंद्रीय नेतृत्व राज्यसभा उमेदवारीची घोषणा करेल, असे फडणवीस यांनी पक्ष प्रवेश सोहळ्याच्या वेळी स्पष्ट केले. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या राजकीय अनुभवाबरोबर प्रशासकीय अनुभवाचा फायदा घेण्यात येईल, असा दावा फडणवीस यांनी स्पष्ट केला.Ashok Chavan will be the Union Minister

अशोक चव्हाण यांनी भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, गिरीश महाजन (Girish Mahajan), नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पक्ष प्रवेश केला आहे. या सोहळ्यानंतर अशोक चव्हाण यांचा राज्यसभा उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कुठल्याही पदासाठी अशोक चव्हाण हे भाजपमध्ये आले नाहीत. असे पक्ष प्रवेशावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. असे असले तरी अशोक चव्हाण यांना राज्यसभा खासदार आणि लगेच मंत्रिपद देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. देशाच्या विकासाच्या वाटेत मोदींच्या सोबत अशोक चव्हाण येत असल्याचे फडणवीस म्हणाले. भाजपसाेबत काँग्रेसचे आमदार आणि इतरही नेते भाजपमध्ये येतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. मराठवाड्यात भाजपसाठी हा फायद्याचा पक्ष प्रवेश असेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. (Ashok Chavan will be the Union Minister)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT