Shiv Sena MLA Disqualification Case Sarkarnama
मुंबई

MLA Disqualification Case: नार्वेकर किती वाजता निर्णय देणार? सरोदेंचा सवाल; वकील म्हणून मला...

Mangesh Mahale

Pune Political News: शिवसेनेसाठी आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा (Shiv Sena MLA Disqualification Case) निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) अवघ्या काही तासांमध्ये देणार आहेत.

आज (बुधवारी) दुपारी 4 नंतर कधीही हा निकाल जाहीर होईल. निकाल कोणत्या गटाच्या बाजूने लागतो? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. निकालापूर्वी अॅड. असिम सरोदे यांनी एक फेसबूक पोस्ट शेअर करीत आज निर्णय होणार का? असा सवाल उपस्थित केला आहे.

"वकील म्हणून मला किंवा इतर वकिलांना Maharashtra Legislative Assembly सचिव यांच्याकडून इमेल आलेला नाही की राहुल नार्वेकर किती वाजता निर्णय जाहीर करणार? जर 400 ते 500 पानांचा निर्णय तयार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज निर्णय देणे आवश्यक आहेच तर किती वाजता निर्णय जाहीर करणार हे कळवायला इतका उशीर का? असा सवाल सरोदे यांनी उपस्थित केला आहे. सत्तासंघर्षामध्ये शिवसेना शिंदे गटाचे 16 आमदार आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांचे भवितव्य काय असेल हे आज स्पष्ट होणार आहे.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. यामध्ये कोणत्या गटातील आमदार अपात्र ठरतात हे आज स्पष्ट होणार आहे. असे असतानाच याच महिन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल होणार आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी काल (मंगळवार) रात्री दहा वाजता तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह डीजीपी रश्मी शुक्ला उपस्थित होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढं जवळपास नऊ महिने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु होती. दोन्ही बाजूंच्या एकूण सात याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली. कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली तर हरीश साळवे, महेश जेठमलानी यांनी शिंदे गटाची बाजू मांडली.

20 डिसेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अवघा महाराष्ट्रच नव्हे तर सारा देश निकाल ऐकण्यास उत्सुक आहे. शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार की ठाकरे गटाचे? शिंदे सरकार जाणार की राहणार? का याप्रकरणी वेगळाच निकाल लागणार? याच उत्तर आज मिळणार आहे.

राज्यपालांच्या वतीनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला. या प्रकरणात प्रामुख्यानं दोन कळीचे प्रश्न होते. एक म्हणजे 'व्हिप' कोणाचा लागू होतो? म्हणजे कायदेशीरदृष्ट्या प्रतोद कोण? तर दुसरा प्रश्न म्हणजे ठाकरेंना बहुमत चाचणी करायला सांगणं हा कायदेशीरदृष्ट्या राज्यपालांचा निर्णय योग्य होता का? अखेर सर्वोच्च न्यायालयानं 12 मे 2023 रोजी निकाल दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT