bjp vs shivsena ubt sarkarnama
मुंबई

Mumbai Politics : डोंबिवलीच्या मोठागावचं वजन वाढणार? गावतले तीन शिलेदार वेगवेगळ्या मतदारसंघात आजमावताय नशीब

Maharashtra Vidhan Sabha Election: कल्याण लोकसभा मतदार संघातील तीन विधानसभा मतदारसंघात डोंबिवली पश्चिमेतील मोठागावं यंदा केंद्रबिंदू राहिला आहे. कारणही तसंच आहे.

शर्मिला वाळुंज

Mumbai News : कल्याण लोकसभा मतदार संघातील तीन विधानसभा मतदारसंघात डोंबिवली पश्चिमेतील मोठागावं यंदा केंद्रबिंदू राहिला आहे. येथील तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावण्यासाठी उतरले आहेत.

कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व व डोंबिवली मतदारसंघातील राजेश मोरे, दीपेश म्हात्रे व सुलभा गायकवाड हे उमेदवार असून सुलभा यांचे हे माहेर आहे. हे मोठागावचे शिलेदार आपला गड राखण्यात यशस्वी झाल्यास कल्याण डोंबिवली महापालिकेत मोठागावचे वजन आपसूक वाढेल.

डोंबिवली पश्चिमेतील मोठा गाव हा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेचा विषय ठरला आहे. याच गावातून तीन वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरत, आपले नशीब आजमावत आहेत. डोंबिवली मतदारसंघातून शिवसेवा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दीपेश म्हात्रे, कल्याण ग्रामीण मतदारसंघातून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेना पक्षाचे राजेश गोवर्धन मोरे, आणि कल्याण पूर्व मतदारसंघातून भाजपच्या सुलभा गणपत गायकवाड हे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

मोठा गावातील या तिन्ही उमेदवार आपल्या आपल्या मतदारसंघात मतदारांशी संवाद साधत असून, त्यांच्या समर्थनासाठी विविध प्रकारचे प्रचार कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. प्रत्येक उमेदवाराने आपल्या क्षेत्रातील मतदारांसाठी विविध योजना, विकासकामे व सेवा वचनबद्ध केल्या आहेत, ज्यामुळे मतदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे. डोंबिवलीतील मोठा गावातील तिन्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. एकाच गावातील तीन उमेदवार विधानसभा निवडणुकीत उतरणे हे दुर्लभ असून, यामुळे मोठागावचे राजकीय महत्त्व वाढले आहे.

माहेरवाशीण सुलभा..महिला उमेदवाराचे लक्षवेधी नेतृत्व

कल्याण पूर्वेतील भाजपचे (BJP) आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना यंदा उमेदवारी देण्यात आली आहे. सुलभा यांचे माहेर मोठागाव आहे. कल्याण लोकसभेतून पहिल्यांदा महिला उमेदवारास उमेदवारी देण्यात आली असून, त्या पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. त्या विजयी झाल्यास कल्याण लोकसभेतील महिलांचे नेतृत्व सुलभा या विधानसभेत करतील.

शिवसेनाविरुद्ध शिवसेना

डोंबिवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दीपेश म्हात्रे हे या मतदारसंघातून लढत आहेत. शिंदेकडून ठाकरेंकडे जात उमेदवारी घेत त्यांनी युती विरोधात ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या या निवडणुकीतील भूमिकेने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन उत्साह निर्माण केला आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिंदे गटाकडून राजेश मोरे हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ते पहिल्यांदाच आमदारकी लढवत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT