Jitendra Awhad : महायुतीची जाहिरात बघितली, मुस्लिमांची टोपी नाही; जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'केंद्र सरकार हे...'

MLA Jitendra Awhad criticism of BJP mahayuti Ek Hai To Seif Hai advertisement : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसाठी महायुतीने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत मुस्लिमांची टोपी नसल्यावरून जितेंद्र आव्हाड भाजपला सुनावले.
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महायुतीच्या आजच्या जाहिरातीचा समाचार घेतला. धर्मद्वेष सुरू झालेला आहे.

"भाजप महायुतीची जाहिरात बघा, देशातल्या सर्वांचे टोप्या दाखवल्या आहेत. पण मुस्लिमांची टोपी दाखवली नाही. एका राजकीय पक्षाने मुस्लिमांना बाजूला काढणे, जे केंद्रात सत्तेत आहेत, त्याच्यावरून त्यांच्या मनात नेमकं काय आहे, हे स्पष्ट दाखवत आहे", असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला लगावला.

विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. भाजपने हिंदुत्वाचे कार्ड पुन्हा बाहेर काढले आहे. त्यानुसार जाहिराती देखील प्रसिद्ध केल्या जात आहेत. भाजप महायुतीची आज प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लक्ष वेधले. भाजपला यावरून काही सुनावले देखील

Jitendra Awhad
Aditya Thackeray: गद्दारांना बर्फाच्या लादीवर बसवणार; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर मोठा हल्ला

जितेंद्र आव्हाड म्हणाले, "जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजून वाढत चालला आहे. तसा महायुती हिंदुत्वाचा विखारी प्रयोग वाढवला आहे. आज भाजप (BJP) महायुतीने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत देशातल्या सर्वांच्या टोप्या दाखवल्या आहेत. पण मुस्लिमांची टोपी दाखवलेली नाही. मुस्लिमांमध्ये टोपी नसते. ती त्यांच्याकडे पद्धत आहे. मशिदमध्ये प्रार्थना करण्यासाठी जाताना डोकं उघडं ठेवून जात नाही. त्यामुळे मुस्लिम ही स्कल कॅप घालतात". गांधी टोपी ही गांधींची टोपी नाही, कारण गांधींनी कधीच टोपी घातली नाही. ती प्रचलित नावाप्रमाणे ओळखली जाते, असा टोला देखील जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

Jitendra Awhad
Mumbai Political Families: ठाकरे, सरदेसाई, राऊत यांच्यासह 'या' नेत्यांची नातीगोती निवडणुकीच्या मैदानात

"भाजप महायुतीच्या या जाहिरातीवर हल्ला चढवताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, एका राजकीय पक्षांनी मुस्लिमांना बाजूला काढणे जे केंद्रात सत्तेत आहेत, त्याच्यावरून त्यांच्या मनात नेमकं काय आहे ते स्पष्ट दाखवत आहेत. 'एक है तो सेफ है', याचा दुसरा अर्थ लोक सेफ नाही आहेत. दहा वर्ष झालेले प्रधानमंत्री जेव्हा हे बोलतात तो त्या प्रधानमंत्री यांचा पराभव आहे", असा खोचक टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

"खरंतर पंतप्रधानांचा राजीनामा घ्यायला हवा. प्रधानमंत्री कसा म्हणू शकतात, सेफ नाही म्हणून. पाच हजार वर्षे कोणी एक नव्हतं, चातुर्वाण्यांमध्ये सर्व विभागले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दरवाजा बाहेर बसवलं, कॉलेजमध्ये पाणी नाही पिऊ दिलं, शासकीय अधिकारी झाल्यानंतर त्यांचा पिऊन फाईल टेबलावर फेकायचा, हातात पण नाही द्यायचा. पण संविधानाच्या माध्यमातून त्याच लोकांना एक आणलं", याची आठवण जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला करून दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com