Uddhav Thackeray, EKnath Shinde Sarkarnama
मुंबई

Shivsena News: जोगेश्वरीत मोठा राडा! मध्यरात्री दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, VIDEO आला समोर

Shiv Sena UBT vs Shiv Sena: ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मंगळवारी रात्री मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटांत जोरदार राडा झाला. जोगेश्वरीत शिवसेना शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामाने आल्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

Jagdish Patil

Mumbai News, 13 Nov : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मंगळवारी रात्री मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटांत जोरदार राडा झाला. जोगेश्वरीत शिवसेना शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामाने आल्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांचे कार्यकर्ते जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात महिलांना काही वस्तूंचे वाटप करत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. शिवाय या वस्तूंचे ते वाटप का करत आहेत? याबाबतचा जाब विचारायला ठाकरे गटाचे कार्यकर्ते गेले असता हा राडा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात महिलांना काही वस्तूंचे वाटप केलं जात असल्याची माहिती मिळताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा मोठा जमाव मातोश्री क्लबबाहेर जमला होता. यावेळी दोन्हीबाजूचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत होते. तर वायकरांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दगडफेक केल्याचा आरोप ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

मातोश्री क्लबवर गुंड आहेत

दरम्यान, पोलिसांनी ऐनवेळी हस्तक्षेप केल्याने परिस्थिती आटोक्यात आली. तर हा राडा सुरू होताच या ठिकाणी ठाकरे गटाचे जोगेश्वरी पूर्वचे उमेदवार बाळा नर देखील उपस्थित होते. या राड्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केला. मुंबईत सर्व ठिकाणी असे प्रकार सुरू आहेत. अनेक ठिकाणी पैसे वाटले जात आहेत. आम्ही याबाबत निवडणूक आयोगाला कळवले आहे. मातोश्री क्लबवर गुंड आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी आम्ही इथे आल्याचं परब म्हणाले.

हेच का ठाकरे गटाचे संस्कार?

रात्रीच्या राड्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या (Shivsena) महिला नेत्या शीतल म्हात्रे यांनी घटनास्थळी येऊन ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, "मातोश्री क्लबबाहेर ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते शूटिंग करत होते. आमच्या महिलांनी जाब विचारला तर कार्यकर्त्यांनी महिलांवरती हात उचलला. हे ठाकरे गटाचे संस्कार आहेत का, हा सवाल मला उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना विचारायचा आहे?" दरम्यान, आता या राड्याप्रकरणी ठाकरे गटाच्या 3 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT