Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Video Uddhav Thackeray : मुंबई जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंचा 'मास्टर प्लॅन'

Roshan More

Uddhav Thackeray News : विधानसभा निवडणुकीत लोकसभेप्रमाणे विधानसभेत देखील मुंबईत ठाकरे गटाची ताकद आहे हे दाखवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मास्टर प्लॅन तयार केला आहे. मुंबईत ठाकरे गटाचेच वर्चस्व टिकवण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघात 18 नेते आणि 18 सहाय्यकांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

प्रत्येक नेत्यावर दोन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. या मतदारसंघांचे सर्व्हेक्षण करून त्याचा अहवाल 25 ऑगस्टला उद्धव ठाकरेंकडे सादर केले जाणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला पराभूत करण्याच्या चंग उद्धव ठाकरेंनी बांधला आहे. महाविकास आघाडीने मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर करावा आपला त्याला पाठींबा असेल असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रि‍पदापेक्षा महायुतीला पराभूत करणे महत्त्वाचे असल्याचा संदेश मित्रपक्षांना दिला. मुंबईत ठाकरे गटाची ताकद जास्त आहे. त्यामुळे येथे जास्तीत जास्त लढवत त्या जिंकण्यासाठी ठाकरे गट आत्तापासूनच कामाला लागला आहे.

काँग्रेस-ठाकरे गटात रस्सीखेंच

महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरे गटात मुंबईतील जागांसाठी रस्सीखेच असणार आहे. जास्तीत जास्त जागा मुंबईत लढण्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. तर, मुंबईत काँग्रेसची ताकद असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येतो आहे.

'या' नेत्यांवर जबाबदारी

विनायक राऊत : वरळी, दादर- माहीम

अनिल देसाई: जोगेश्वरी आणि अंधेरी

अनिल परब: मागाठाणे, दहिसर

राजन विचारे: विलेपार्ले, कालिना

मिलिंद नार्वेकर: दिंडोशी, गोरेगाव ⁠

सुनील प्रभू : मुलुंड, भांडुप

अजय चौधरी: चेंबूर, अणुशक्तीनगर

सचिन अहिर: कुलाबा, मुंबा देवी

विलास पोतनीस: शिवडी आणि मलबार हिल

⁠वरूण सरदेसाई: सायन कोळीवाडा, धारावी

विनोद घोसाळकर: वडाळा, भायखळा

अमोल कीर्तिकर: घाटकोपर , मानखुर्द-शिवाजीनगर

रमेश कोरगावकर: बोरीवली, कांदिवली

मनोज जामसुतकर: चारकोप, मालाड

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT