Ajit Pawar : 'गुलाबी सरडा...' राऊतांच्या टीकेला अजितदादांचं प्रत्युत्तर; म्हणाले, "आई-बापानं जन्माला घातलं म्हणून..."

NCP Ajit Pawar On Shivsena UBT Sanjay Raut : "कोण आम्हाला शिव्या देतंय, कोण आम्हाला शाप देतंय तर कोण कोणाला सरडा म्हणतंय अन् कोण कोणाला ढेकूण म्हणतंय. पण सरडा आणि ढेकूण म्हणून राज्याचा कायापालट होणार आहे का?"
sanjay raut, ajit pawar
sanjay raut, ajit pawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 18 August : "कोण आम्हाला शिव्या देतंय, कोण आम्हाला शाप देतंय तर कोण कोणाला सरडा म्हणतंय अन् कोण कोणाला ढेकूण म्हणतंय. पण सरडा आणि ढेकूण म्हणून राज्याचा कायापालट होणार आहे का?" असा प्रश्न उपस्थित करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

अजित पवारांच्या गुलाबी कॅम्पेनवरुन टीका करताना संजय राऊत यांनी (Sanjay Raut) अजित पवारांचा उल्लेख सरडा असा केला होता. आता राऊतांच्या याच टीकेला अजितदादांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

जनसन्मान यात्रेत बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, "कोण आम्हाला शिव्या देतंय, शाप देतंय तर कोण कोणाला सरडा म्हणतंय तर कोण कुणाला ढेकूण म्हणतंय. पण ढेकूण आणि सरडा म्हणून राज्याचे प्रश्न सुटणार आहेत का? राज्याचा कायापालट होणार आहे का? याचं उत्तर विरोधकांनी द्यावं. उगाच आई बापांनी जन्माला घातलं म्हणून उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं चालतं का?" अशा शब्दात त्यांनी राऊतांचा समाचार घेतला.

sanjay raut, ajit pawar
Chhagan Bhujbal : "मी स्वतः त्यांच्या कार्यक्रमाला जातो, पण..."; रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले...

तर जनसन्मान यात्रा सुरू झाल्यापासून मी ठरवलं आहे की, फक्त विकासाचं बोलायचं ठरवलं होतं. त्यामुळे गरिबीमध्ये जगत असणाऱ्या माझ्या माय माऊली, माझे बांधवांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायचे आणि त्यांच्यासाठी योजना आणायच्या असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

sanjay raut, ajit pawar
Maratha Reservation : नितेश राणेंना मराठा आंदोलकांनी अडवलं, गो बॅकच्या घोषणा

राऊत नेमकं काय म्हणाले?

मुंबईतील पदाधिकारी मेळाव्यात बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, "सुप्रिया सुळे ही महाराष्ट्राची लाडकी बहीण आहे. पण त्यांच्या लाडक्या भावांनी रंग बदलला आता पिंक झालेत. सरडा रंग बदलतो अचानक ते गुलाबी झाले. आता हा पिंक सरडा बारामती सोडणार आहे. पण ते कुठे जाणार हे माहीती नाही. पण एक सांगतो गुलाबी रंग हा महाराष्ट्राला धार्जीण नाही. त्यामुळे त्यांचा पराभव होणार." अशा शब्दात त्यांनी अजित पवारांवर टीका केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com