Vishal Patil : विशाल पाटलांचं उद्धव ठाकरेंना पुन्हा चॅलेंज! आटपाडीत शिंदे गटाला पाठिंबा...

Sangli Khanapur Vidhan Sabha : विशाल पाटील यांनी दिल्लीत उद्धव ठाकरेंना विधानसभेसाठी एकत्र राहण्याचा शब्द दिला होता. त्यानंतर सांगलीत आल्यानंतर पाटलांनी ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या विरोधात जाहीर भूमिका केल्याने खळबळ उडाली आहे.
Vishal Patil
Vishal PatilSarkarnama
Published on
Updated on

Sangli Political News : लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत ठिणगी पडली होती. त्याची पुनरावृत्ती आता विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. खासदार विशाल पाटील यांनी थेट महायुतीच्या उमेदवाराला

पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. पाटील यांची ही भूमिका ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये पुन्हा वादाचे कारण ठरण्याची शक्यता आहे. (Vishal Patil News)

विशाल पाटील Vishal Patil यांनी दिल्लीत उद्धव ठाकरेंना विधानसभेसाठी एकत्र राहण्याचा शब्द दिला होता. त्यानंतर सांगलीत आल्यानंतर पाटलांनी ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या विरोधात जाहीर भूमिका केल्याने खळबळ उडाली आहे. विशाल पाटलांनी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे शिवसेना गटाशी पुन्हा भिडणार असल्याचे स्पष्ट केले. सांगलीच्या खानापूर विटा मतदारसंघात महायुतीचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांच्या पाठिशी राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खानापूर विटा मतदारसंघ हा महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला जाणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. शिवसेनेकडून तशी मागणी देखील करण्यात आली आहे. असे असतानाही खासदार पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत खानापूर विटा मतदारसंघात वेगळी भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. आपण अपक्ष असून कोणाला घाबरत नाही. आम्हाला कोणी बोलायचे कारण नाही, अशा भाषेत खासदार विशाल पाटलांनी आघाडी आणि ठाकरे गटाला इशारा दिला आहे.

Vishal Patil
Dilip Walse Patil : आंबेगावातून दिलीप वळसे पाटील निवडणूक लढणार की नाही? म्हणाले, नाईलाजास्तव मला...

काँग्रेसचे सहयोगी सदस्य असणारे अपक्ष खासदार विशाल पाटील आणि काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी दिल्लीत उद्धव ठाकरेंची भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकत्र लढण्याचा शब्द दिलेला आहे. दुसऱ्या बाजूला विशाल पाटलांनी मतदारसंघात येऊन विरोधात भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी आणि ठाकरे गट विशाल पाटलांच्या बाबतीत काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Vishal Patil
Rachna Banerjee : भावनेच्या भरात मोठी चूक! या महिला खासदारांना मागावी लागली जाहीर माफी...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com