Raj Thackeray, Amit Thackeray, Sada Sarvankar Sarkarnama
मुंबई

Amit Thackeray : अमित ठाकरेंनी सरवणकरांवर सोडले पहिले ‘रॉकेट’; आता माहिमचे रण पेटले...

Sada Sarvankar Mahim Dadar Assembly Constituency : माहिम विधानसभा मतदारसंघात दोन शिवसेना आणि मनसे अशी तिरंगी लढत होणार आहे.

Rajanand More

Mumbai News : मुंबईतील माहिम विधानसभा मतदारसंघातील लढत हायहोल्टेज होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचे स्पष्ट करत प्रचारालाही सुरूवात केली आहे. त्यानंतर आता मनसेचे उमेदवार व पक्षाध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंनीही सरवणकरांना ललकारले आहे.

भाजपने या निवडणुकीत अमित ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सरवणकरांना उमेदवारी मागे घेण्याबाबत विनंती केली होती. मात्र, सरवणकरांनी माघार घेण्यास नकार दिल्याने माहिममध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अमित ठाकरे यांनी यापूर्वी सरवणकरांबाबत बोलणे टाळले होते. पण शुक्रवारी ट्विट करत त्यांनी सरवणकरांचा समाचार घेतला. माहीम विधानसभा मतदारसंघात अनेक वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असलेल्या विद्यमान आमदारांनी विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूकच केली. प्रत्येक वचने हवेत विरली, आणि जनता मात्र फसवली गेली, अशी टीका ठाकरेंनी केली आहे.

आता हा लढा मी थेट तुमच्या हक्कांसाठी लढणार आहे. मायबाप जनतेचा आशीर्वाद पाठीशी आहे. आता खरंच बदल होणार, आता न्याय मिळणार, असे मतदारांना उद्देशून अमित ठाकरे म्हणाले आहेत.

दहा वर्षे तुम्ही सत्तेत होता. आजचं दादर माहिम पाहिल्यानंतर मला निवडणुकीत उभे राहण्याशिवाय पर्याय नव्हता, असेही ठणकावून सांगत अमित ठाकरे यांनीही सरवणकरांना जणू ललकारले आहे. ठाकरेंनी आपली भूमिका आता स्पष्ट केल्याने ही लढत काँटे की टक्कर होणार असल्याचे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT