Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : 'मातोश्री'वरील बैठकीला खासदार-आमदार उपस्थित, उद्धव ठाकरेंनी काय सांगितले?

Roshan More

Uddhav Thackeray Shivsena : लोकसभेत महाविकास आघाडीला यश मिळाले. मात्र, महाविकास आघाडीचा घटक असलेल्या ठाकरे गटाला अपेक्षित जागा जिंकता आल्या नाहीत. त्यामुळे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट अलर्ट मोडवर आहे. आज (रविवारी) उद्धव ठाकरेंचे निवासस्थान 'मातोश्री'वर महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला आमदार, खासदार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

निवडणुकीच्या तयारीला लागा, असे सूचना या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी दिल्या. तसेच लोकसभेमध्ये ज्या चुका झाल्या त्या पुन्हा होऊ नये, याची काळाजी घेतली पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मातोश्रीवर झालेल्या बैठकीला विनायक राऊत, दत्ता दळवी,मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई, अमोल कीर्तीकर, अरविंद सावंत, ओम राजे निंबाळकर आणि विविध भागातील नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसभेला 'धनुष्यबाण' चिन्ह नसल्याचा फटका ठाकरे गटाला बसला. त्यामुळे आपले 'मशाल चिन्ह' घरोघरी पोहोचवा, असा आदेश या बैठकीत उद्धव ठाकरेंनी दिला.

गटप्रमुख, पदाधिकाऱ्यांवर लक्ष

सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात कोणी आहे का? याचा आढावा उद्धव ठाकरे यांनी घेतला. तसेच संपर्क प्रमुखांना गटप्रमुख ते तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची माहिती असलेल्या याद्या देण्यात आल्या आहेत. या पदाधिकाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. या गटप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आढावा घेण्याच्या ठाकरेंकडून संपर्कप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT