Gulabrao Patil, Aaditya Thackeray Sarkarnama
मुंबई

Assembly Session : त्यांच्या बापाला कळलो म्हणून..! आदित्य ठाकरे टोचून बोलले, गुलाबराव पाटलांनी थेट बाप काढला...

Maharashtra Budget session 2025 Gulabrao Patil Aaditya Thackeray News : विधानसभेत बुधवारी दुषित पाण्याच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा झाली.

Rajanand More

Mumbai News : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. पाण्यातील वाढत्या नायट्रेटच्या प्रमाणावर चर्चेदरम्यान ही शाब्दिक चकमक उडाली. ठाकरेंनी मंत्र्यांना खातं कळतं की नाही, असा प्रश्न करत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नद्यांमधील दुषित पाणी, पाणीपुरवठ्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातील काही आमदारांनीही याबाबत गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारले. पाटील यांच्याकडून त्यावर उत्तरे दिली जात होती.

पाटील यांच्या उत्तरांवर नाना पटोले, प्रशांत बंब यांच्यासह नितीन राऊत यांनीही आक्षेप घेतला. पाटील बोलत असताना समोरील बाकावर बसलेल्या आदित्य ठाकरेही बोलायला लागले. त्यावर पाटील यांनी तुम्ही शांत बसा, असे दरडावले. त्यानंतर ठाकरेंच्या पक्षातील आमदारांनीही आवाज चढवला. विधानसभेचे अध्यक्षांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूला शांत केले.

गुलाबराव पाटील यांचे बोलून झाल्यानंतर अध्यक्षांनी ठाकरेंना बोलण्याची संधी दिली. यावेळी आदित्य यांनी पाटलांना उद्देशून डिवचले. ते म्हणाले, इथे अनेक मंत्री अभ्यास करून येतात. मुख्यमंत्री प्रश्नांना उत्तरे देतात. अध्यक्षांनीही याविषयीवर दालनात एक बैठक घ्यावी, कारण मंत्र्यांचं उत्तर रँडम आहे. आपलं कृषी प्रधान राज्य आहे. आपण बोटं दाखवून चालणार नाही.

ठाकरे एवढ्यावरच थांबले नाही. ते पुढे म्हणाले, आतापर्यंत जर यांना वाटत असेल की बैठक लावायला पाहिजे. तर मग मुळ विषय राहतो, की यांना खातं कळलंय की नाही. सत्ताधारी पक्षाचेही अनेक प्रश्न आहे. त्यांनाही ते उत्तरे देऊ शकत नाहीत. त्यामुळे हे उत्तर राखीव ठेवून मंत्र्यांना सांगा अभ्यास करून उत्तरे द्या, अशी विनंती ठाकरेंनी अध्यक्षांकडे केली.

आदित्य ठाकरे खाली बसल्यानंतर गुलाबराव पाटील यांनीही लगेच त्यांना प्रत्युत्तर दिले. त्यांच्या बापाला कळलो होतो म्हणून मला खातं दिलं होतं, हे त्यांना माहित नाही अजून, असे म्हणत पाटील यांनी थेट बाप काढला. त्यानंतर वडील असा उल्लेख करत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पाटलांनी बाप असा उल्लेख करण्यावरून ठाकरेंच्या आमदारांनी आक्षेप घेतला. त्यानंतर अध्यक्षांनी वैयक्तिक शेरेबाजी कुणावरही करू नये, ते मी रेकॉर्डवरून काढून टाकणार, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT