
Nagpur News, 05 Feb : अभिनेता विकी कौशल याच्या छावा (Chhava) चित्रपटावर भूमिका मांडली म्हणून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत (Indrajit Sawant) यांच्यावर ब्राह्मणांचा द्वेष केल्याचा आरोप करत प्रशांत कोरटकर याने फोनवरून धमकी दिली होती. याबाबतची माहिती स्वत: सावंत यांनी फेसबुकवर पोस्टद्वारे दिली होती.
'जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा'; असं म्हणत कोरटकरने (Prashant Koratkar) सावंत यांना शिवीगाळ करक जीवे मारण्याची दिली धमकी दिली होती. शिवाय यावेळी कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल देखील वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप सावंत यांनी केला होता.
त्यानंतर सर्वच स्तरातून टीका आणि निषेध सुरू झाल्यावर होताच, तो फोन मी केलाच नाही आणि तो मी नव्हेच अशी भूमिका कोरटकरने घेतली. मात्र, या प्रकरणी कोल्हापूर (Kolhapur) पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीने सीडीआर आणि लोकेशनची माहिती मिळवली असता इंद्रजीत सावंत यांना प्रशांत कोरटकरच नावाच्या व्यक्तीनेच फोन केल्याचं उघडकीस आलं. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मात्र, अशातच आता नागपूर (Nagpur) पोलिसांच्या सायबर सेलमध्ये लेखी तक्रार दिली आहे. यामध्ये त्याने माझा मोबाईल हॅक करून इंद्रजीत सावंतांना कॉल केल्याचा दावा केला आहे. शिवाय याआधीही माझं फेसबुक अकाउंट हॅक केलं होतं. तेव्हा 'एआय'चा वापर करून माझा आवाजात सावंत यांना कॉल केल्याचा संशय देखील कोरटकरने तक्रारीत म्हटलं आहे.
तसंच मोबाईल हॅक करून कॉल करणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी देखील कोरटकरने सायबर सेलकडे केली आहे. त्यामुळे आता पोलिस यावर नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.