Nana Patole, Bhai Jagtap

 

sarkarnama

मुंबई

भाईंना पाहून नानांनी केली मान वाकडी ; कॉग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर

शेजारी अंथरलेल्या 'रेड कार्पोरेट' वरून भाई आले. भाई येत असल्याचे पटोलेंच्या नजरेत आले आणि पटोले कॅमेऱ्याकडे पाहून बोलू लागले. नानांना पाहिलेल्या भाईंनी त्यांच्याकडे न पाहता पायऱ्यांवर आले.

ज्ञानेश सावंत

मुंबई : काँग्रेस नेत्यांमधील गटबाजी लपून राहात नसल्याचे विधीमंडळाच्या आवारात बुधवारी उघडपणे दिसून आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) समोरासमोर येऊनही नमस्कार सोडा; पण एकमेकांडे पाहिले नाही. भाईंना पाहून नानांनी मान वाकडी केली; तर भाईंनीही इकडे-तिकडे न पाहाता निघून गेले. त्यावरून प्रदेश काँग्रेस-मुंबई काँग्रेस म्हणजे, नाना-भाईमधील मतभेदाच्या दरीचा अंदाज आला.

विधीमंडळाच्या आवारात बुधवारी सकाळी सव्वाअकरा वाजता आलेले नाना हे दारातच माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत होते. त्याचवेळी म्हणजे, ११ वाजून २५ मिनिटांनी भाईही आवारात आले. तेव्हा विधान भवनाच्या पायऱ्याच्या अलीकडे नानांची मुलाखत सुरू होती. शेजारी अंथरलेल्या 'रेड कार्पोरेट' वरून भाई आले. भाई येत असल्याचे पटोलेंच्या नजरेत आले आणि पटोले कॅमेऱ्याकडे पाहून बोलू लागले. नानांना पाहिलेल्या भाईंनी न पाहता पायऱ्यांवर आले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यापासून नाना आणि भाई यांच्यात मतभेद असल्याचे दिसून आले. त्यातून एकमेकांच्या निर्णय न पटण्याची भूमिकाही या दोघा नेत्यांनी घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे दोघे फारसे एकत्र येताना दिसत नाही. त्यात भर म्हणजे, येत्या २८ डिसेंबरला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सभेच्या परवानगीवरून तर प्रदेश कांग्रेस आणि मुंबई काँग्रेसमध्ये मतभेद नव्हे तर वादच असल्याचे दिसून आले.

प्रदेश पातळीवरच्या नेत्यांना विश्वास न घेताच भाईनी सभेसाठी राज्य सरकार आणि त्यानंतर न्यायालयात धाव घेतल्याचा आरोप काँग्रेसच्याच नेत्यांचा होता. त्यावरून दोन्ही संघटनांमधील नेत्यांचे दिल्ली दरबारातून कानही टोचले गेल्याची सूत्रांकडून सांगण्यात आले होते. या घटनेपासून तर नाना-भाईमध्ये वाद वाढत गेल्याचे बोलले जात आहे. या वादाचा परिणाम म्हणजे, मुंबईतील राहुल यांची सभाच रद्द करावी लागली. त्यामुळे दिल्लीची नाराजी ओढवून घेतलेल्या मुंबई काँग्रेसने अर्थात, भाई जगताप यांनी आपला पवित्रा कायम ठेवल्याचे दिसत आहे.

मुंबई काँग्रेसला कृतीतूनच उत्तर देण्याचा प्रदेश काँग्रेसचा म्हणजे, नानांचा इरादा दिसत आहे. विरोधकांना तोंड देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकजूट दाखविली, त्यासाठी विधीमंडळातच बोलाविलेल्या बैठकीला या दोन्ही पक्षांचे जवळपास सर्वच आमदारांची हजेरी लावली. मात्र, काँग्रेसच्या बहुतांशी आमदार, मंत्र्यांनी सोयीच्या वेळेत उपस्थिती लावल्याचे दिसून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT