Atal Setu controversy : मुंबईतील अटल सेतूवर जुलै 2024 मध्ये पहिली आत्महत्या झाली. मयताचे ओळख पटवून, प्रकरण क्लोज झाले. डोंबिवलीमधील के. श्रीनिवास, आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणाला आता दोन वर्षे झाली आहेत.
आपल्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र मिळत नसल्याने मयत के. श्रीनिवास यांच्या पत्नीने न्यायालयात धाव घेतली आहे. विशेष म्हणजे, मुंबई उच्च न्यायालयाने या विधवा महिलेची याचिका देखील स्वीकारली आहे.
जवळपास दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीमधील के. श्रीनिवास यांनी अटल सेतूवरून आत्महत्या केली. के. श्रीनिवास यांनी कर्जबाजारीपणा कंटाळून ही आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. तशी मुंबईतील (Mumbai) अटल सेतू वरील ही पहिलीच आत्महत्या होती. त्यामुळे खळबळ उडाली होती.
के. श्रीनिवासन यांच्या मृतदेहाचा बराच शोध घेऊनही तो हाती लागला नाही. सीसीटीव्ही फुटेजवरून पत्नीने संबंधित व्यक्ती पतीच असल्याची ओळख पटविली; मात्र कायद्यानुसार हरवलेल्या किंवा मृतदेह न सापडलेल्या व्यक्तीला मृत घोषित करण्यास सात वर्षांचा कालावधी आवश्यक असतो; मात्र के. श्रीनिवास यांच्या आत्महत्येस अवघे एक वर्ष नऊ महिने झाले आहेत. अपवादात्मक परिस्थितीचा आधार घेऊन पत्नीने न्यायालयात (Court) धाव घेतली आहे.
के. श्रीनिवास यांच्या पत्नीची ही याचिका न्यायालयाने स्वीकारली असून त्यावर लवकरच सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. भारतीय पुरावा कायद्यान्वये संबंधित प्राधिकरणासमोर लेखी पुरावे सादर करण्याचे, तसेच सीसीटीव्ही चित्रीकरणाची सत्यता सिद्ध करण्यासाठी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांनी सुचवले.
लेखी किंवा कागदोपत्री पुरावे नोंदवून घेतल्याशिवाय दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या व्यक्तीला बेपत्ता जाहीर करू शकतो का? असा प्रश्नही न्यायालयाने याचिकाकर्तीच्या वकिलांना केला. त्यावर हे फुटेज पुलावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे असून पोलिसांनी त्याची खातरजमा केली आहे. त्यामुळे याचिकाकर्तीला अंतरिम दिलासा मिळणे आवश्यक असल्याचे वकील अनिता कॅस्टेलिनो यांनी न्यायालयाला सांगितले.
विधवा महिलेच्या वकिलाची युक्तिवादाची दखल घेत, न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी जुलै महिन्यात सूचीबद्ध केली. या याचिकेमुळे कायद्यावर विचारमंथन होणार असून, न्यायालय विधवा महिलेच्या याचिकेवर काय निर्णय देते, याची उत्सुकता कायदे तज्ज्ञांना लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.