One Nation One Student ID Card  Sarkarnama
मुंबई

One Nation One ID : वन नेशन वन स्टुडंट आयडी... राज्य सरकार म्हणते 'नो आयडिया'

अय्यूब कादरी

अय्यूब कादरी

One Nation One Student ID Card : त्यासाठी कामही सुरू करण्यात आले आहे. याबाबत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. देशातील हजारो संस्था आणि दोन कोटींपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे.

मात्र, महाराष्ट्रातील शिक्षक, पालक आणि विद्यार्थी याबाबत अनभिज्ञ आहेत. याबाबत शिक्षक आणि पालकांना माहिती देण्यासाठी १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान बैठक आयोजित करावी, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक संस्थांना दिल्याचे सांगण्यात आले होते.

याबाबत ग्रामीण तसेच शहरी भागांतील शिक्षकांना काहीही माहिती नाही. त्यांना कोणत्याही प्रकारचा आदेश किंवा सूचना मिळालेली नाही. त्यामुळे नमनालाच घडाभर तेल अशी अवस्था या योजनेची झाली आहे. असे असले तरी प्रशासकीय यंत्रणेच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा न करता विद्यार्थ्यांना स्वतः वेबसाइटवर जाऊन याची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केंद्र सरकारने २०२० मध्ये आणलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाचा हा एक भाग आहे. शिष्यवृत्ती, पुरस्कार, पदवी, अन्य उपक्रम आदी विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक माहिती या एकाच कार्डमध्ये उपलब्ध असेल.

त्यासाठी आता असलेल्या आधार कार्डप्रमाणे विद्यार्थ्यांना एक युनिक कोड क्रमांक दिला जाईल. या आयडीला APAAR (ऑटोमोटेड पर्मनन्ट अकाउंट रजिस्ट्री) असे नाव देण्यात आले आहे. प्राथमिक शाळेपासून ते उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा या योजनेत समावेश करण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे.

देशभरातील विद्यार्थ्यांना क्यूआर कोड देण्यात यईल. APAAR आणि नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्ककडून (NCRF) हे काम केले जाईल. विद्यार्थ्यांनी हस्तगत केलेल्या सर्व कौशल्यांची माहितीही यात असणार आहे. यासाठी पालकांची संमती आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांचा सर्व डेटा गोपनीय राहील, आवश्यक असेल तेथेच फक्त सरकारी संस्थांना माहिती दिली जाईल. ज्या पालकांनी यासाठी संमती दिली आहे, त्यांना काही शंका असल्यास पालक आपली संमती मागे घेऊ शकतात, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना स्वतःही वेबसाइटवर जाऊन नोंदणी करता येईल त्याची प्रक्रिया आणि निकष पुढीलप्रमाणे असेल-

ABC Bank (abc.gov.in) या पोर्टलवर नोंदणीची सुविधा आहे. आतापर्यंत देशातील दोन कोटींपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करता येते. खासगी आणि शासकीय शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी यासाठी पात्र आहेत.

APAAR (Automated Permanent Academic Account Registry) कार्डची नोंदणी केल्यानंतर ABC कार्ड डाउनलोड करता येईल. त्यावर १२ अंकी APAAR क्रमांक असेल. त्याचा वापर करून विद्यार्थ्यांना पोर्टलकडून उपलब्ध सर्व सुविधांचा लाभ घेता येईल.

abc.gov.in वर अशी करा नोदणी-

वरील वेबसाईट ओपन करा. होमपेजची प्रतीक्षा करा. Login वर क्लिक करा. त्यानंतर Signup चे बटन दाबा. नोंदणी पूर्ण करण्यासाठी मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांकाचा वापर करा. आता तुमची शाळा, महाविद्यालय किंवा विद्यापीठ आणि वर्ग किंवा अभ्यासक्रम निवडा.

त्यांनतर अर्ज सबमिट केला की तुमचे APAAR आयडी कार्ड जनरेट होईल. ते डाउनलोड करून घ्या. त्यातून तुम्हाला तुमची सर्व माहिती उपलब्ध होईल. कार्ड डाउनलोड केल्यानंतर त्यात उपलब्ध तुमच्या सर्व माहितीची खातरजमा करून घ्या. सध्या हजारो संस्था आणि दोन कोटीमपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी APAAR कार्डसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे.

सर्व माहिती एकाच ठिकाणी-

अधिकारी आणि शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना ईमेलवर पाठवली जाईल. विद्यार्थ्यांसाठी एक अंतर्गत पोर्टलही असेल. तेथे सर्व सूचना, बातम्या, घडामोडी, शिष्यवृत्तीची माहिती, शुल्क भरणा आदी सर्व प्रकारची माहिती विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असेल.

SCROLL FOR NEXT