Gopichand Padalkar News : धनगर जागा झाला तर साहेब, दादा, ताई कोण म्हणणार; पडळकरांनी डिवचले

Dhangar Reservation News : धनगर समाजाने कुऱ्हाडी द्याव्यात, भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचे वक्तव्य
Gopichand Padalkar News
Gopichand Padalkar NewsSarkarnama

Kolhapur News : धनगर जागा झाला तर आपल्याला साहेब कोण म्हणणार ? दादा, ताई कोण म्हणणार, याची चिंता अनेकांना लागली आहे. धनगर समाजाच्या भोळेपणाचा फायदा अनेकांनी घेतला, पण आता धनगर समाजाने काठी सोडून हातात कुऱ्हाड घ्या, असे वक्तव्य भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केले आहे. पट्टणकोडोली येथे झालेल्या धनगर जागर यात्रा मेळाव्यात ते बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या मेळाव्यात आमदार पडळकर यांनी राष्ट्रवादीचे (NCP) नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. गुलामगिरीतून बाहेर पडा, जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत प्रस्थापित धनगर समाजाचा (Dhangar Reservation) फायदा घेणारच. महाराष्ट्रातील धनगर जागा झाला तर पिल्लावळीतील राज्यकर्ता तयार होणार नाही, ही पवारांना भीती आहे. धनगर एकत्र असल्याने धनगरांच्या संघटना फोडायला सुरुवात केली. त्यामुळे समाजावरील अन्याय रोखण्यासाठी, धनगर समाजाने काठी देण्यापेक्षा कुऱ्हाडी द्याव्यात, त्यासोबत घोंगडे द्यावे, असा सल्ला पडळकर यांनी समाजाला दिला.

Gopichand Padalkar News
BJP Mla Nitesh Rane News : अंबादास दानवे यांचे विरोधी पक्षनेतेपद जाणार, छोट्या राणेंचा दावा...

नाताळच्या सुटीनंतर धनगर आरक्षणचा निकाल होण्याची शक्यता आहे. सुरुवातीपासूनच धनगर समाजाला आरक्षण आहे, पण 'र' आणि 'ड' चा घोळ पवारांनी घातला. प्रस्तावित औलादिने धनगर समाजावर अन्याय केला, आमच्या मायबापाचा भोळेपणाचा भंडारा लावून फायदा घेतला, असा आरोप पडळकरांनी केला.

कोल्हापुरातून विधानसभा सदस्य का नाही ?

जागर यात्रेत बोलताना पडळकर यांनी, कोल्हापुरात 5 लाख धनगर समाज आहे; पण एकही आमदार खासदार नाही मिळाला. प्रशासनात नोकरीची टक्केवारी मिळाली नाही, असा हल्लाबोल पडळकरांनी केला.

करवीर नगरीत पडळकरांना शाहूंचाच विसर

आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या करवीर नगरीत मंगळवारी पडळकर यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर जागर यात्रा घेतली. पण ज्यांनी आरक्षण दिले होते, त्याच राजर्षी शाहू महाराजांचा विसर पडळकर यांना पडला. व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज, सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सरसेनापती यशवंतराव होळकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांचे फोटो ठेवण्यात आले होते.

Edited by : Amol Jaybhaye

Gopichand Padalkar News
Shivsena Nashik Politcs : ठाकरेंची खेळी...तांबेंना करावा लागणार शुभांगी पाटलांचा प्रचार!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com