Jitendra Awhad -Uddhav Thackeray-Naresh Maske Sarkarnama
मुंबई

Shinde Group Allegation : जितेंद्र आव्हाड, ठाकरे गटाकडून महाराष्ट्रात दंगे घडविण्याचे प्लॅनिंग... ; शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप

Jitendra Awhad &Shivsena News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी आदल्या दिवशी फिरून लोकांची डोकी भडकविण्याचे काम करत होते.

Vijaykumar Dudhale

Thane News : जालन्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आधार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाने ठाण्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात दंगे कसे होतील, याचे प्लॅनिंग केले. मात्र, मराठा समाजाने त्यांना भाव दिला नाही, असा खळबळजनक आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. (Jitendra Awhad &Thackeray group planning to create riots in Maharashtra : Sensational allegation of Shinde group)

माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गट आणि आव्हाड यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ठाण्यात मराठा क्रांती मोर्चाने बंदचे आवाहन केले होते. शांततामय मार्गाने ते आंदोलन करणार होते. त्यांना कोणीही विरोध केला नव्हता. मात्र, ठाण्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून दंगे कसे पेटतील. हे मराठा मोर्चाचे आंदोलन कसे तीव्र होईल, याचं प्लॅनिंग राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि ठाकरे गटाचे काही मंडळी करत होते.

या दोन्ही पक्षांनी त्यांचे शहराध्यक्ष आणि इतर नेते प्रत्येक विभागात पाठविले होते. पण, नागरिकांनी आणि मराठा समाजाने त्यांना भाव दिला नाही. त्यांच्या सांगण्यावर कुठेही विश्वास ठेवला नाही, त्यामुळे ठाण्यातील बंद शांततेच्या मार्गाने पार पडला, असा दावाही म्हस्के यांनी केला.

प्रत्येक गल्लीत आणि वस्तीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच ठाकरे गटाचे पदाधिकारी आदल्या दिवशी फिरून लोकांची डोकी भडकविण्याचे काम करत होते. पण, त्यांना मनोज जरांगे पाटील यांनी जे उत्तर दिले आहे, ‘मराठा समाजाचा प्रश्न फक्त एकनाथ शिंदेच सोडवू शकतात, आमचा त्यांच्यावर विश्वास आहे,’ असे विधान करून त्यांनी विरोधकांना फार मोठी चपराक दिलेली आहे. महाराष्ट्र पेटविण्याचे त्यांचे उद्योग होते, ते धुळीस मिळाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT