Shrikant Shinde Sarkarnama
मुंबई

Shrikant Shinde : 'राम मंदिर झाले आता मुख्यमंत्री मलंगगडालाही मुक्ती देतील...'

Thane Malanggad : खासदार श्रीकांत शिंदेंचा ठाणेकरांना शब्द

सरकारनामा ब्यूरो

भाग्यश्री प्रधान आचार्य

Kalyan Political News : राम मंदिर ज्याप्रमाणे मोठ्या संघर्षानंतर उभे राहिले त्याचप्रमाणे मुख्यमंत्री मलंगगडालाही मुक्ती देतील, असे ठाम वक्तव्य खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. ते मलंगगडावरील अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी बोलत होते.

कल्याण येथील श्रीमलंगडाच्या पायथ्याशी मागील आठवडाभरापासून राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह-श्री मलंगगड हरिनाम महोत्सव सुरु होता. या कीर्तन महोत्सवाचा मंगळवारी समारोप झाला. या समारोपावेळी खासदार शिंदेंनी मलंगगडाबाबत ठाणेकरांना मोठे आश्वासन दिले आहे.

यावेळी खासदर शिंदे म्हणाले, 'स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा कोथळा या महाराष्ट्रात दोनदा कोथळा काढण्यात आला. पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी तर दुसऱ्यांदा प्रतापगडावरील अतिक्रमणे सरकारने काढली तेव्हा. हे धर्माचे काम असून धर्माला पुढे घेऊन जाण्याचे काम आमच्या हातून होत आहे,' अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'देशात प्रभू श्रीराम मंदिर उभे राहील याचा विचार आपल्यापैकी कोणीच केला नव्हता. ते राम मंदिर आज उभे राहत असून येणाऱ्या काळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मलंगगडाला मुक्ती दिल्याशिवाय राहणार नाहीत,' असा विश्वासही खासदार डॉ. शिंदेंनी व्यक्त केला.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT